Home ताज्या बातम्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त,”हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” पदयात्रा संपन्न

स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त,”हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” पदयात्रा संपन्न

0

निगडी,दि.०९ ऑगस्ट २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिका, फ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १३ यमुना नगर सेक्टर २२ मध्ये, मा. आयुक्त राजेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली, “हर घर तिरंगा घर घर तिरंगा” ०६ ऑगस्ट २०२२ रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.१३ मार्च २०२१ पासुन सुरु झालेल्या या अमृतमहोत्सवाला, येत्या स्वातंत्र्य दिनी ७५ वर्ष पूर्ण होत असून,मा.पंतप्रधान यांच्या आवाहनावरून, स्वातंत्र्य सैनिक तसेच शाहिदांना मानवंदना व त्यांची आठवण म्हणुन, परीसरा मध्ये, नागरीकांमध्ये, तसेच विद्यार्थ्यां मध्ये देशभक्ती ची भावना जागृत व्हावी या उद्देशाने घरोघरी तिरंगा फडकवत हा उत्सव साजरा व्हावा या हेतूने, जनजागृती करत पदयात्रा काढण्यात आली.स्व. मधुकरराव पवळे विद्यालय तसेच काळभोर गोठा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यालयातील एकुण चारशेहून अधिक विद्यार्थी यात सामील झाले. शालेय गणवेशात हातात फलक घेऊन, ढोल ताशे वाजवत, प्लॅस्टिक बंदी तसेच स्वच्छतेचा संदेश देत, “हर घर तिरंगा घर घर तिरंगाचे” नारे देण्यात आले.मा.सिताराम बहुरे सरांनी मनोगत व्यक्त करताना, देशभक्ती प्रमाणे स्वच्छतेची भावना देखील, आपल्यांमध्ये रुजवावी. असा संदेश उपस्थितीतांना दिला.या पदयात्रेची सुरूवात स्व. मधुकरराव पवळे शाळा प्रानांगणात, सकाळी ठिक ८.०० वाजता, प्लॅस्टिक बंदची शपथ घेऊन करण्यात आली.तसेच डेंग्यू /हिवताप विषयावर सुध्दा जनजागृती करण्यात आली
यावेळी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी मा.सिताराम बहुरे सर, साहाय्यक आरोग्य अधिकारी, श्री. शांताराम माने, श्री.एस.एस.गायकवाड (सि.एस.आय) आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे सर,मा नगरसेवक श्री सचिन चिखले, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले आरोग्य निरीक्षक भुषण शिंदे अमित सुतार एम. पी. डब्ल्यु. यमुना नगर रुग्णालय तसेच जनवाणी संस्थेचे प्रभाग १३चे प्रभारी ज्ञानेश्वर शेळके, व सर्व जनवाणी पर्यवेक्षक उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + seven =

error: Content is protected !!
Exit mobile version