Home ताज्या बातम्या देहूरोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे...

देहूरोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल त्या पत्राची चौकशी करून आयुक्त साहेब कारवाई करतील का ?

0

देहुरोड,दि.०२ ऑगस्ट २०२२( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड पोलीस निरीक्षक वर्षा राणी पाटील यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे.या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या पत्राची चौकशी आयुक्त साहेब करतील का हे पत्र स्वतः पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड अंकुश शिंदे यांना दिल्या असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री- रामदास आठवले साहेब, पिंपरी चिंचवड शहरातील अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ 2 आनंद भोईटे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहूरोड यांना सर्वांना प्रत रवाना असल्याचे या पत्रात दिसत आहे. नक्की या पत्रावर कारवाई होणार का ?

देहूरोड शहरात सोशल मीडियावर होणाऱ्या पत्राची चौकशी आयुक्त साहेब करणार का? देहुरोड पोलीस स्टेशन गुन्हेगारांचा अड्डा होत आहे का? पोलीस अधिकारांच्या भांडणात राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीस इंटरनल खुन्नस बाजीसाठी वापर करत आहेत,यामुळे पोलीस प्रशासनाचे नाव शहरात मलीन होत आहे,पोलिसांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलत आहे. देहूरोड शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष शिना छाजेड यांचे देहूरोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील मॅडम यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे,देहूरोड मध्ये क्राईम पी आय म्हणून राजेंद्र निकाळजे कार्यरत होते त्यांचे आणि वर्षाराणी पाटील मॅडम यांचे खात्याअंतर्गत कामातून खटका उडाला होता.त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे संपूर्ण देहूरोड शहराला व पिंपरी चिंचवड पोलीस खात्यात सर्व जाणून आहेत. राजेंद्र निकाळजे यांना त्रास देण्यासाठी शिना छाजेड यांना फूसलवून दिशाभूल करून वापर करत असल्याचे त्या पत्रात म्हटले आहे. सदर पत्राची चौकशी करून पत्रात म्हटल्याप्रमाणे देहूरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची बदली आयुक्त साहेब करतील का ? किंवा त्यांच्यावर काय कारवाई करतील असा सवाल जनतेतुन उठत आहे. पत्रात असलेल्या सर्व नावांची व पत्रात म्हटल्याप्रमाणे वापर केलेल्या गुंडांची गुन्हेगारांची नावे उघड होतील का? व त्यांच्यावर कारवाई होईल का? असे नाना प्रकारचे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. त्यामुळे देहूरोड पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे एकंदरीत दिसत आहे.राजेंद्र निकाळजे यांची बदली करून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जणू निकाळजेंवर एक प्रकारे अन्याय केला होता त्यामुळे आताचे आयुक्त अंकुश शिंदे हे निकाळजे यांना पुन्हा देहुरोड स्थित पाठवतील का? देहुरोड पोलीस स्टेशनची चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिसरात जोरात वायरल होत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन हाद्दीत आयुक्त साहेब शांतता सलोखा बैठक घेण्याची वेळ जवळ येत आहे. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्यावर कारवाई झाल्यास त्या गुन्हेगारांना आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना जरब बसेल व पोलिसांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल त्या पत्रात म्हटल्याप्रमाणे काही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे किती राजकीय सामाजिक कार्यकर्ते या अधिकाऱ्यांच्या गळाला आहेत. मात्र पत्र खोटे असल्यास पत्र लिहिणाऱ्यावर कारवाई करा त्या पत्राची दखल घेऊन पोलिसांप्रती नागरिकांमध्ये आदर वाढवला जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

त्या वायरल होणाऱ्या पत्रात काय लिहिले आहे ते पाहूया

प्रति . मा . अंकुश शिंदे साहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालय
विषय : – देहूरोड पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्यापासून षडयंत्र रचून मला जीवीतास धोका असणे बाबत
महोदय ,
मी सत्य सांगत आहे की , देहूरोड पीआय वर्षराणी पाटील यांचा व्यक्तिगत राग व सूड भावना पीआय राजेंद्र निकाळजे साहेब यांच्या प्रती आहे . ६ महिन्यान पासून मला गुन्हेगारांकडून त्रास होत असल्याने, मी देहूरोड पीआय वर्षाराणी पाटील मॅडम यांचाकडे तक्रार केली असता त्यांनी गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई न करत माझी दिशाभूल करून . मात्र हे गुन्हेगार पीआय राजेंद्र निकाळजे साहेब यांचे असल्याचे व त्यांच्या सांगण्यावरून त्रास देत असल्याचे मला तसे भासवले . व माझी मानसिकता बनवली . गुन्हेगाराकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता . ते आपण ( पोलीस आयुक्त साहेब ) मला समजून सांगितल्याने मी आत्मदहन करण्याचा निर्णय माघार घेतला . आपण या बाबत कारवाही करण्यासाठी पी आय वर्षाराणी पाटील मॅडम यांना सांगितल्यावरती ते म्हणाले तुम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे तक्रार केली तिकडेच जा . मी कोणतीही कारवाई करणार नाही . त्यामुळे मला आता भीती वाटते . पीआय वर्षराणी पाटील मँडम गुन्हेगाराकडून माझा घातपात करून अपघात करून किवा खुनी हल्ला करून मला व माझ्या कुटूंबाला जीवे मारून पीआय राजेंद्र निकाळजे यांनी केल्याचे भासवुन त्यांचावर कारवाई होईल आणि त्यांचा स्वतचा सूड घेतील . मात्र त्यांच्यामुळे मला व माझ्या कुटंबाला जीवीतास धोका निर्माण झाला आहे . त्यामुळे आपण पीआय वर्षाराणी पाटील मँडम व गुन्हेगार यांच्यावर करवाई करावी . हि नम्र विनंती .


NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 10 =

error: Content is protected !!
Exit mobile version