Home ताज्या बातम्या गावातील लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच घेतले विषारी द्रव

गावातील लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच घेतले विषारी द्रव

0

बीड,दि.०५ जुलै २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गावातील लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विषारी लिकवीड प्राशन केले.त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले असून प्रकृती स्थिर आहे. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.समाधान शिवाजी धिवार (२५, रा. काळेगाव घाट, ता. केज) असे त्या तरुणाचे नाव आहे. ४ जुलै रोजी त्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विषारी द्रव प्राशन केले. प्रवेशद्वारावर तो भोवळ येऊन पडल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. याचवेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची गाडी कार्यालयात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी गाडीतून खाली उतरून संबंधित तरुणाला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक भारत काळे, अंमलदार आशिष वडमारे, संतोष रणदिवे, अभिजित सानप यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी तातडीने उपचार सुरू केले. याबाबत उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
समाधान धिवार याने १ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यात नवनाथ सोनवणे, इरफान शेख, जितेंद्र सोनवणे, बाबा शेख, शौकत शेख (सर्व रा.मस्साजोग) हे पैशासाठी त्रास देत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्याकडून गंभीर गुन्हा होण्याची शक्यता असून वृद्ध आईवडिलांनादेखील ते भेटू देत नाहीत. त्यांच्यापासून संरक्षण द्यावे, अशी मागणी समाधान धिवारने केली होती. ३० जूनपर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्याने दिला होता.

विष प्राशन करणारा तरुण ऊसतोड मजूर आहे. त्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, ते मुकादम आहेत. उचलीच्या पैशांचा मूळ वाद आहे. यापूर्वी समाधानच्या आईच्या फिर्यादीवरुन संबंधितांवर गुन्हा नोंद केला होता. शुल्क भरल्याशिवाय संरक्षण देता येत नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
– शंकर वाघमोडे, सहायक निरीक्षक, केज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version