Home ताज्या बातम्या देहुरोड- सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या

देहुरोड- सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या

0

देहुरोड,दि.२८ जुन २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सासरच्या छळाला कंटाळून साईनगर देहुरोड येथील एका विवाहितेने गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२६) रोजी सकाळी घडली आहे.मुलीवर अत्यंसंस्कार झाल्यानंतर दि.२७ जुन रोजी देहुरोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी पती मिलींद महेंद्र कांबळे(वय-३५)व सासु यांना अटक केली आहे.आत्महत्या केलेल्या मुलीला २०१५ ते २६/०६/२०२२ पर्यंत वेळोवेळी साईनगर , मामुर्डी रा. हवेली जि पुणे येथे मुलीच्या सासरी शिवीगाळ , मारहाण करून , अपमानकारक वागणूक देवुन तीचा शारीरीक , मानसिक छळ करून तीला क्रूर वागणुक देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने फिर्यादी यांच्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली.
विवाहित मुलीचे वडील सुरेश गोपाळ भालेराव (वय ६३) वर्षे रा वृंदावन हॉसिंग सोसायती , ई विंग , नं . ३०८ बँक ऑफ इंडियाचेवरती , विकासनगर , देहुरोड ता हवेलि जि पुणे यांनी फिर्याद दिल्यानुसार देहुरोड पोलिस स्टेशन येथे गु.रजि. ४३३/२०२२ भादवि कलम ४९८( अ ),३०६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी सपोनि जाधव हे असुन पुढील तपास देहुरोड पोलिस करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 7 =

error: Content is protected !!
Exit mobile version