Home ताज्या बातम्या माजी गारठले तर भावी थंडावले निवडणूक लोकशाही पद्धतीने मात्र जोर हुकुमशाहीचा

माजी गारठले तर भावी थंडावले निवडणूक लोकशाही पद्धतीने मात्र जोर हुकुमशाहीचा

0

किवळे-रावेत,दि.१९ मे २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात झाली आहे.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला लागलेत. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू झाली. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात झाली. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो. विकासकामातील अडथळ्यांचे खापर कधी नोकरशाहीवर तर कधी प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावावर फोडता येते. जनसामान्यांच्या निष्क्रियतेवर ही फोडता येते.अनेक बुद्धीदांडगे या कामी उपयोगाला येतात.नागरी हक्कांसाठी झगडावे लागते आणि सवलतींसाठी कधी पाय धरावे लागतात तर कधी तर कधी हात ओले करावे लागतात. निवडणुक पुर्व काळात आश्वासनांची खैरात होते. इतर वेळी ताठरपणे वागणारे राज्यकर्ते या काळात नम्रपणे हसु लागतात.मग मतदाराला आपण राजा झाल्याचे भास होउ लागतात. आता राजा म्हणल कि उदार होण आलच. त्याला ती सुखाउन नेणारी बाब असते.

“एवढा मोठा अध्यक्ष पण आपल्याला फोन केला” “आठवणीने कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र पाठवल””केलेल्या कामाचा ‘न चुकता’ ‘न मागता’ हिशोब दिला. आपणहुन परिक्षेला बसला. स्वत:हुन प्रगतिपुस्तक दिल. चुकतय जरा माणुस म्हणुन माफ करायची संधी सोडण्याचा करंटेपणा मतदार राजाने करावा काय? अहो अशी संधी पाच वर्षांनी एकदा येते.अहो पेपर मधे रोज येतय की पिंपरी चिंचवड शहराचा विकास हाच आमचा श्वास. बघा आमचा हात हातात घेउन. विकासाची नाडी लागणारच. कुणी म्हणतय कि आम्ही कोकाटे इंग्लिश पेक्षा फाडफाड विकास करु. .कुणी म्हणतय कि आजच्या राजकारण्यांकडे दुरदृष्टीचा अभाव आहे. आम्हाला संधी देउन बघा. गरिबीत पिचलेल्या बहुजनांचे काटकुळे पाय जर एकत्र आले तर हत्तीच बळ आमच्या पायात येईल. मराठी माणसाच्या हृदयात डोकावुन पहा विकासाच्या इंजिनाची धडधड ऐकायला येईल.ऐकायला येत नसेल तर आम्ही बातमीतुन कानाखाली आवाज काढू कान साफ करुन देउ.काय म्हणताय? अतिक्रमणे वाढलीय , वाहतुक वाढलीय, रस्ते कमी पडताहेत. विकास आराखड्यातले नियोजित रस्ते इतकी वर्षे रखडलेत. वीस पंचवीस वर्षांच काय घेउन बसलात.होतील हळु ह्ळु सुधारणा. आपल्या पिंपरी चिंचवड व प्रभागात समाजसुधारकांची कमी नाही. संततीनियमनाच काम जर त्यांनी केलं नसत ना तर ही पुण्यभुमी लोकसंख्येच्या भाराने केव्हाच पातळात विलिन होउन गेली असती. म्हणुन तर परिसरालाच आम्ही आता वेगळीच ओळख करुन देतोय.पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखड्यात पुर्वीपासुन आहे बर का? काय आहे कि इथला विकास आम्ही मुद्दामुनच राखुन ठेवलाय. एकदम बकाबका जेउ नये.आणि चार घास कमीच खावेत माणसाने. रवंथ करायला वेळ नको का? एकदम पचत नाही. आन विकास काय कुठे पळुन जातो का? आपल्याच खिशात आहे तो. तंगी लागली कि बाहेर काढायचा थोडा थोडा. पुरवुन पुरवुन खायला लागतो. काय आहे कि खाणारी तोंड आता वाढलीत. वरुन आलेली शिदोरी पुरत नाही आता. महागाई किती वाढलीय बघताय ना? आपल्याला ढेकर आल्याशिवाय बाकीच्यांना देता येत नाही. वरुन शिदोरी आली कि ही मोकळी करु. आहे काय आन नाही काय?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक जून जुलै किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार हे मात्र निश्चित आहे.नक्की कोणत्या महिन्यात तारीख ठरणार यावर मात्र सगळीकडे संभ्रम आहे. प्रभागात दिग्गज उमेदवार आमने सामने लडण्यासाठी तयारी करत आहे. तर काही माजी नगरसेवक तर काही भावी नगरसेवक तर काही इच्छुक अशांची संख्या वाढत आहे. मात्र काहींनी नागरिकांन मतदारांन मध्ये आकर्षण मिळावे म्हणून कामाचा धडाका लावला होता.कुठे कार्यक्रम घ्या, लाईट गेली, कुठे रस्ता केला असे विविध सोशल मीडिया वरती अशा विविध कामाच्या पोस्ट आज ही व्हायरल होत आहे. मात्र नागरिकांना नक्की काय हव आहे याकडे अजूनही आजी-माजी भावी सर्व इच्छुक उमेदवारांचे दुर्लक्ष आहे. उमेदवारांनी तर कॉलनी सोसायटी आपलीच मक्तेदारी आहे अशा पद्धतीने प्रचारही सुरू केला आहे, लोकशाही पद्धतीने निवडणूक होते खरं पण प्रत्यक्षात लोकशाहीला फाट्यावर मारत हुकूमशाहीला पुढे आणले जात आहे.अनेक सोसायटी,कॉलनी, मोठ्या बिल्डिंग चे चेअरमन तसेच भावी उमेदवार हे दुसरा उमेदवार सोसायटीत आला नाही पाहिजे किंवा त्याचा प्रचार झाला नाही पाहिजे नागरिकांच्या लोकशाही तत्वावर पूर्णपणे बंधन टाकण्याचे काम करत आहे. आत्ताची जनताही सुज्ञान आहे नक्कीच अशा हुकूमशाहीला फाटा मारत चांगला उमेदवार निवडून देतील काही माजी नगरसेवक व भावी नगरसेवक मिळून काम करत होते अनधिकृत बांधकामाचा पैसाही त्यांनी मिळवला लोकांना धमक्या देणे लोकांची कामे कशी अडवणे स्वता कंट्रक्शन करुन बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण तर काही नगरसेवक पार्सल येऊन प्रभागात घर भाड्याने घेऊन मी याच प्रभागात ला आहे असे दाखवत सर्वसामान्य व्यक्ती असेल पत्रकार असतील ओळखीचे जवळचे कार्यकर्ते असतील त्यांच्या नावाने स्वता फेक पत्रव्यवहार करून लोकांना त्रास देण्यासाठी काम करत आला व करत आहे तर काही भावी नगरसेवक यांना आपण नगरसेवक होणार आहोत, मात्र नगरसेवकाचे कार्य काय आहे. नगरसेवक महानगरपालिकेत कोणती काम करू शकतो किंवा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी एक स्वतःचा विजन काय आहे अशी कोणतीही गोष्ट एका हि उमेदवाराकडे दिसत नाही. माहिती न घेता मात्र एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत आहे. विरोधक उमेदवाराने कार्यक्रम घेतला आहे तुम्ही कार्यक्रमाला जायचं नाही आपण कार्यक्रम घेणार आहोत त्या वेळेस कार्यक्रमाला या तर काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत नागरिकांना वेठीस धरण्याचे काम संभाव्य भावी उमेदवार करीत आहे मात्र निवडणूक पुढे गेली म्हणुन माजी नगरसेवक सर्व गारठले आहेत.तर भावी नगरसेवक हे थंडावले आहेत कारण कामाचं नियोजन नाही नागरिकांना काय हवे याची माहिती नाही फक्त फक्त आर्थिक बाजू भक्कम आहे म्हणून मला नगरसेवक बनायच तर काही ना हार फुले मिळवण्यासाठी नगरसेवकपद पाहिजे तर काहींना एकमेकांच्या खुन्नस मुळे नगरसेवक व्हायचा आहे पब्लिक है सब जानती है अंदर क्या है बहार क्या…त्यामुळे ह्यात जनतेला येडं समजून हे भावी नगरसेवक स्वतःच्या मनमानी दाखवताय काही भावी उमेदवार यांना खूप मोठा अनुभव आहे.अशा पद्धतीने वागत आहे तर काही उमेदवार आत्ताच नगरसेवक झालो अशा पद्धतीने वागत आहे जनतेची नाडी जनतेशी बोलण्याची शब्द फेक नागरिकांच्या समस्या नागरिकांमध्ये सर्वात जास्त वेळ देणे याकडे दुर्लक्ष करीत आहे तर काही भावी नगरसेवकांच्या कुटुंबाने व भावी नगरसेवकांनी ज्या मतदारांचे मतदान आहे. त्यांच्याच रस्ते अडवले आहे. ज्यांच्या जीवावर नगरसेवक व्हायचंय त्यांना शिव्या देत आहेत. मला फक्त नगरसेवक व्हायचे म्हणून शांत आहे आहे एकदा नगरसेवक होऊ द्या मग दाखवतो अशी भाषा संभाव्य भावी नगरसेवकांमध्ये आहे मला या पक्षाचे तिकीट मिळणार मला त्या पक्षाचे तिकीट मिळणार मी खासदारांच्या जवळच आहे हे मी आमदारांच्या जवळच आहे. मला दादा,भाऊ,आण्णा,आप्पा बोलले तिकीट देणार मला तिकीट देणारच नाही तर मी वरून तिकीट आणणार नागरिकांची कामं नाही केली तर निवडणुकीत आर्थिक भ्रष्टाचार केला तरी निवडून येता येत त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका अशा अनेक चर्चा नागरिकांपर्यंत पोहोचले असून या प्रभागातील मतदारांमध्ये तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रभागांमध्ये ह्या सर्व चर्चा चालू आहे त्यामुळे हा सर्व भावी संभाव्य स्वार्थी उमेदवारांच्या भावी नगरसेवक यांना मतदान पेटीतून हे मतदार त्यांची जागा दाखवतील ज्याला खरंच नगरसेवक व्हायचा आहे त्यांनी जर खरच मनापासून निस्वार्थीपणे समाजसेवा सुरू केली असेल तरच संध मिळणार. तो शांत बसणार नाही सतत काम चालू ठेवणार. नुसता मेसेज पाठवणार या दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणे दुसऱ्याने काम केलं तिसऱ्याने फोटो काढणे सोशल मीडियावर सोडणे म्हणजे नागरिकांची कामे नाहीत नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करणे नागरिकांच्या समस्या आहेत त्यावर त्या प्रभागात ज्याच्या वार्डात त्याच्या कॉलनी त्याचा रस्त्यावर जाऊन त्या जाणून घेतल्या पाहिजेत आपला प्रभाग कुठून कुठपर्यंत आहे. आपल्या प्रभागात कोणत्या गोष्टींचे कमी आहेत कोणत्या गोष्टींचा गरजा आहे याकडे सर्व उमेदवारांचे दुर्लक्ष आहे. अर्थात पंधरा वर्षानंतर नगरसेवकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही लोकांचा बदलत चालला आहे मी या गावातूनच पॅनल बनवणार नगरसेवक निवडून आणणार त्या गावातला पॅॅनल करू नका. असे अनेक उद्योग भावी संभाव्य उमेदवार करत आहेत. नगरसेवक व्हायचंय तर प्रभाग संपूर्ण अभ्यासला पाहिजे संपूर्ण प्रभागात सर्वांची भेटीगाठी केल्या पाहिजे निवडणूक लोकशाही पद्धतीने होत आहे लोकशाहीचा पुरस्कार करून सर्व उमेदवारांना सोसायटीचे चेअरमन असतील कॉलनीतले उमेदवार असेल किंवा गुंडा असतील प्रभावी संभाव्य आणि प्रत्येकाला हिरो दिला पाहिजे भेटू दिले पाहिजे नाकी अडवले पाहिजे ज्या आरती अनेक सोसायटीचे कॉलनी चेअरमन संभाव्य उमेदवारांना अडवतात त्या आरती ते लोकशाहीचा पुरस्कार करत नाही ते लोकशाही विरोधक आहेत त्यांना आजही हुकूमशाही हवी आहे त्यामुळे मतदार राजा येणाऱ्या निवडणुकीत मतदानादिवशी संभाव्य भावी उमेदवारांना त्यांची जागा दाखवतील आणि चांगला अभ्यासु सुशिक्षित प्रभागाचा अभ्यास असणाऱ्या उमेदवारास निवडणूकीत निवडुन द्या.जर अडवा अडवी वाढली तर खुणशी वाढतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.त्यामुळे यंदा ची निवडणुक हि दहशतीत पार पडती की काय या कडे सर्वांचे लक्ष लागुन आहेत.सर्व आजी माजी भावी उमेदवार नगरसेवक सगळ्याची लफडी,भ्रष्टाचार,खोडया ह्या जनतेला माहित आहेत वेळ आल्यास त्यापण बाहेर येतील.काही माजी नगरसेवक तर दडुन लपुन बसलेत,लपुटगिरी करण्याची सवय काय गेली नाही,तर भावी आ बैल मुझे मार असे करत आहेत.तीन उमेदवारांचा एक प्रभाग असुन दोन महिला ओपन व एक पुरुष एस.सी/ एसटी आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे सर्वच उमेदवार व महिला उमेदवारही निवडणुक रिंगणात दिसणार आहेत.त्यामुळे न थांबता काम करा.महणजे नागरिक न विचार करता मतदान करतील.माञ यंदा अपक्ष नगरसेवक जास्त निवडुन येतील अशी जोरदार चर्चा नागरीकांन मध्ये सुरु आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − eight =

error: Content is protected !!
Exit mobile version