Home ताज्या बातम्या किवळे- शुक्रवारपासून श्री बापदेव महाराज वार्षिक उत्सव ;भंडारा, निकाली कुस्त्यांच्या आखाडयाचे आयोजन

किवळे- शुक्रवारपासून श्री बापदेव महाराज वार्षिक उत्सव ;भंडारा, निकाली कुस्त्यांच्या आखाडयाचे आयोजन

0

किवळे,दि.०५ मे २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- किवळे गावचे ग्रामदैवत श्री बापदेव महाराजांचा वार्षिक उत्सव शुक्रवारपासून ( दि.६ ) पासून शनिवार ( दि. ७ ) पर्यंत होणार तसेच बुधवारी ( दि .११ ) बैलगाडी ( छकडी ) स्पर्धा आयोजित केली आहे. वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम , लोकनाट्य , अगोदरच ठरलेल्या निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार आहेत . निकाली कुस्त्यांसाठी श्री बापदेव महाराज ‘किताब व मनाची गदा तसेच रोख स्वरूपात बक्षिसे ठेवली आहेत. उत्सवासाठी मंदिरांची रंगरंगोटी , विद्युत रोषणाई , मंडप , कुस्त्यांचा आखाडा तयारी करण्यात आली .समस्त ग्रामस्थ मंडळी व श्री बापदेव महाराज उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी ७ वाजता श्रींची विधिवत महापूजा व अभिषेक तर सायंकाळी पाच वाजता श्री बापदेव महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री ८ वाजता पारंपरिक वाद्यांवर छबिना मिरवणूक निघणार आहे . रात्री नऊला किरणकुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम बापदेव मंदिराजवळ सादर होणार आहे .

शनिवारी सकाळी लोकनाट्याच्या हजेरीचा कार्यक्रम त्यानंतर बापदेव महाराजांचा भंडारा कार्यक्रम, शनिवारी दुपारी ४ वाजेपासून अगोदरच ठरलेल्या निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा बापदेव मंदिराजवळच्या बांधण्यात आलेल्या आखाड्यात होणार आहे . पैलवानांना एकूण ५ लाख ५१ हजार रुपयांचा इनाम देण्यात येणार असून श्री बापदेवमहाराज ‘किताब, गदाही देण्यात येणार आहेत . बुधवारी ( दि ११) सकाळी ९ पासून बैलगाडी ( छकडी ) स्पर्धा होणार आहे.कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात गावचा हा मोठा उत्सव होत असल्याने संपुर्ण किवळे ग्रामस्थ व श्री बापदेव महाराज ट्रस्ट पदाधिकारी कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरण आहे.श्री बापदेव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जयंवत तरस(मा.नगरसेवक) यांनी उत्सवा निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.व सर्वानी उत्सवात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अहवान केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 1 =

error: Content is protected !!
Exit mobile version