Home औरंगाबाद युट्युब चॅनल सह मालक आणि अँकर विरोधात गुन्हा दाखल व अटक

युट्युब चॅनल सह मालक आणि अँकर विरोधात गुन्हा दाखल व अटक

0

औरंगाबाद,दि.२४ एप्रिल २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सोशल मिडीयावर युट्युब व धार्मिक-जातीय तणाव निर्माण करुन शत्रुत्व वाढवून सामाजिक एकोपा व सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका यू-ट्यूब चॅनेलचा संपादक आणि अँकर विरोधात औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी मिळून ही कारवाई केली आहे
‘तहफूज-ए-दिन इंडिया’ असे यू-ट्यूब चॅनलचे नाव असून, अँकर सय्यद फारुक अहमद याने व्हिडिओ तयार करून चॅनलचे संपादक कारी झियाउर महफुजुर रहमान फारुकी याने प्रसारित केला होता, असे पोलिसांनी सांगितले. सायबर पोलिस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण सोशल मीडिया पेट्रोलिंगचे काम करीत असतानाच आयुक्तालयाच्या व्हॉटसअ‍ॅप वर आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या निदर्शनास आला. त्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीची माहिती होती. दोन धर्मात अथवा निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढेल आणि एकोप्यास बाधा निर्माण होईल; तसेच सार्वजनिक शांततेविरुद्ध व लोकांमध्ये भिती निर्माण होईल. याची जाणीव असताना चिथावणी देण्याच्या उद्देशाने तो व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारीत केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
( ता . २२ ) सायंकाळी अटक केलेल्या. दोघा आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी ( ता . २३ ) दिले . अटक जीयाउर रहमान महफुजुर रहमान फारुकी ( रा . भडकलगेट , टाऊन हॉल ) असे मालक तर सय्यद . फारुख अहेमद ( रा . सादातनगर , रेल्वे स्टेशन ) असे करण्यात आलेल्या अँकरचे नाव आहे . सायबर पोलिस ठाण्याच्या सोशल मिडीया सेलचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना २१ एप्रिल रोजी व्हॉटस्अप वर एक व्हिडिओ आला होता. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलेल्या राहुल चव्हाण यांनी फिर्यादीवरून चॅनलचा अँकर १५३ व मालक यांच्याविरुध्द ( अ ) , ५०५ ( ब ) , ५०५ ( क ) व ३४ प्रमाणे बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता , सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तिवाद केला. असे युट्युब चॅनल आणि टि.सी नंबरवर पेपर चालवणार्‍यांची संख्या जास्त आहे.व काहीन कडे पेपर अथवा चॅनलची कोणतीही परवानगी नाही तरी खुले आम असे व्हिडीओ बनवुन वायरल करत असतात.व सामाजीक वातावरण बिघडवण्याचे काम करतात या वर जरब बसला पाहिजे अशी चर्चा संपुर्ण औरंगाबाद जिल्हात पसरली असून पुढील सर्व बोगस पञकारांनवर आळा बसेल या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × two =

error: Content is protected !!
Exit mobile version