Home ताज्या बातम्या वॉचमनची नोकरी मिळवण्यासाठी केला खून

वॉचमनची नोकरी मिळवण्यासाठी केला खून

0

दि.१७ एप्रिल २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वॉचमनची नोकरी मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश वरून आलेल्या दोघांमध्ये बाचाबाची हाणामारी एकाने केला दुसऱ्याचा खून वॉचमनची नोकरी पडली महागात ना तुला ना मला घाल कुत्र्याला ही अवस्था दोघांची हि घटना दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी राञी १२.३० वा चे सुमारास मुकाई चौकाजवळ कोहीनुर बिल्डींगचे पाठीमागे सर्व्हे नं ७८ , रावेत ता . हवेली जि . पुणे येथील रामचंद्र शंकरराव मते यांच्या मोकळया जागेतील पत्र्याच्या खोलीसमोर वॉचमन नामे बिट्टु यादव उर्फ ऋषीपाल सिंह सुरेंद्र सिंह(मयत) वय ४६ वर्षे रा . मुळगांव चंदरपुरा तहसील सरसई नावर इटावा उत्तरप्रदेश २०६१२३ हा काम करीत असलेल्या जागेवर आरोपी संजय दामोदर चौव्हान रा . ग्रामदुबारी थाना मधुबन जिल्हा महु राज्य उत्तर प्रदेश यास वॉचमनचे काम करायचे होते . त्याबाबत दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९ : ०० वा चे सुमारास त्या दोघांमध्ये झाले.आरोपीने भांडणाचा राग मनात धरुन आरोपी संजय दामोदर चौव्हान याने यातील मयत बिट्टु यादव उर्फ ऋषीपाल सिंह सुरेंद्र सिंह याच्या डोक्यात व चेहर्‍यावर दगडाने मारुन त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला. म्हणुन आरोपी नामे संजय दामोदर चौव्हान याचे विरुध्द देहुरोड पो.स्टे अंकीत रावेत चौकी येथे गु.रजि.२३२/२०२२ भा.द.वि. वगैरे . कलम ३०२ अन्वये सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद पो.काॅ.गणेश नागरगोजे यांनी दिली.आरोपी अटक असुन तपास अधिकारी विशाल जाधव सहा.पो.नि.रावेत चौकी यांच्या कडे आहे व पुढील तपास देहुरोड-रावेत पोलिस करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − nine =

error: Content is protected !!
Exit mobile version