पिंपरी-चिंचवड, दि 16 एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उद्योग व व्यापार विभागाच्या वतीनं रविवार, दिनांक 17 रोजी उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके हे उद्योजकता विकास मार्गदर्शन आणि व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र घावटे हे उद्योग व्यवसायातील व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होणार आहे अशी माहिती उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजक व उद्योग, व्यापार विभागाचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे यांनी माहिती दिली आहे.
मोशी प्राधिकरण सेक्टर क्रमांक ४, संत नगर येथील पूर्णब्रह्म हॉल येथे या कार्यक्रमास आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे पाटील, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते योगेश बहल आदींसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.