Home ताज्या बातम्या रोहीदास तरस यांना 1 कोटी 30 लाखाला गंडा,बिल्डर अगरवाल विरोधात गुन्हा दाखल;तिघ...

रोहीदास तरस यांना 1 कोटी 30 लाखाला गंडा,बिल्डर अगरवाल विरोधात गुन्हा दाखल;तिघ अटकेत

0

देहुरोड-किवळे,दि.20 मार्च 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड किवळे येथील फसवणुक केल्या प्रकरणी चार बिल्डर वर गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटत नाहीतर पुन्हा आणखी बिल्डर वर गुन्हा दाखल.बिल्डर लाॅबी कडुन फसवणुकीच प्रमाण वाढत आहे. असाच एक प्रकार देहुरोड- किवळे या ठिकाणी भागीदारी संस्था स्थापन करून 1.30 कोटी रूपये स्विकारून संस्थेत एका व्यक्तीस भागीदार म्हणून घेतले . वेगवेगळ्या कागदपत्रांवर सही घेतली तसेच प्रकल्पातील गाळे परस्पर विकून त्याचा नफा त्या व्यक्तीला न देता त्याची फसवणूक केली . 22-07-2016 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान किवळे , देहरोड येथे ही घटना घडली . याप्रकरणी तीन आरोपींना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे . संदीप दिनदयाल अगरवाल , सचिन दिनदयाल अगरवाल , सुमित दिनदयाल अगरवाल आणि कपील सतपाल अगरवाल असे गुन्हा दाखल चार आरोपींची नावे आहेत . त्यापैकी संदीप दिनदयाल अगरवाल, सचिन दिनदयाल अगरवाल आणि सुमित दिनदयाल अगरवाल अटक आहेत . रोहीदास शामराव तरस ( वय 43 , रा .विकासनगर किवळे , हवेली ) यांनी याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गुन्हा रजि. नं.148/2022 भा.द.वि.कलम406,420,465,467,468,471, 34 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शुदिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी किवळे येथील सर्व्हे नंबर 11/3/1 येथील जमिनीवर विकसनासाठी भागीदारी संस्था श्री साई रियालिटी , श्री साई इन्फोटेक , श्री साई बिल्डटेक नावाच्या भागीदारी संस्था स्थापन केल्या . यामध्ये फिर्यादीला भागीदार म्हणून घेत 1 कोटी 30 लाख रूपये भाग भांडवल घेतले . सुरवातीपासून फिर्यादी यांना फसविण्याच्या उद्देशाने आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केले . डीड ऑफ रीटायरमेंट वरती देखील फिर्यादी यांची सही घेतली . आरोपींनी प्रकल्पातील गाळे विकून त्याचा अंदाजे चार कोटी नफा फिर्यादीला दिला नाही . फिर्यादी यांचा विश्वासघात करून खोटे दस्तऐवज तयार केले असे फिर्यादीत नमूद केले आहे . तीन आरोपीना अटक केली असून , देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत .

ताथवडे येथील ओम तिरुपती डेव्हलपर्स ( क्रिसला ) विरोधात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

मामुर्डी येथील मॅजिया अव्हेन्यू या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅटधारकांना फ्लॅटचा ताबा वेळेत न देणे , मालमत्ता हस्तांतरणापूर्वीचे खर्च न भरणे , करारनामा प्रमाणे सुविधा न देणे , वेळेत कामे पूर्ण न करणे अशा अनेक प्रकारे फ्लॅटधारकांचा विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी ताथवडे येथील ओम तिरुपती डेव्हलपर्स ( क्रिसला ) चे संचालक सागर अगरवाल , इराण्णा रायचुरकर , संतोष तरस , ओमप्रकाश अगरवाल या चौघांवर फसवणुकीसह मोफा कायद्यांर्गत देहूरोड पोलीस स्टेशन येथे शुक्रवार दि. १८/०२/२०२२ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिद्दिक इस्माईल शेख यांनी देहूरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये म्हंटले आहे कि, कामाची मुदत होऊनही ओम तिरुपती डेव्हलपर्स यांच्याकडून अजूनही करारनाम्याप्रमाणे सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये फ्लॅटचा ताबा वेळेत न देणे , नकाशा व भोगवटा प्रमाणपत्र न देणे ,मालमतेचे हस्तांतर होण्यापूर्वीच खर्च न भरणे , फ्लॅटधारकांच्या संमतीशिवाय वाढीव बांधकाम करणे , पार्किंग सुविधा न देणे अशा अनेक प्रकारें फसवणूक करून विश्वासघात केला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − nineteen =

error: Content is protected !!
Exit mobile version