मामुर्डी,दि.०१ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिपक भाऊ मधुकर भोंडवे युवा मित्र परिवार द्वारा आयोजित गप्पा-गोष्टी रंजक खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर भाऊजी चेतन कुमार यांच्यासोबत प्रभाग क्रमांक २४ च्या महिलांसाठी ऑर्केस्ट्रा म्युझिक ब्लास्टर निर्माता दिग्दर्शक विजय पानसरे सादर करते, आपल्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये फक्त महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक एलईडी टीव्ही व मानाची पैठणी तसेच द्वितीय क्रमांक फ्रिज व मानाची पैठणी तसेच तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन व मानाची पैठणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात लकी ड्रॉ ज्यामध्ये सात महिलांना मिळणारे मानाचे पैठणी या खेळ रंगला पैठणीचा पाच कार्यक्रम होणार आहेत त्यातील चार कार्यक्रम विविध ठिकाणी विकास नगर किवळे आदर्श नगर साई नगर मामुर्डी रावेत एस बी पाटील शाळेच्या जवळ व तसेच समीर लॉन्स याठिकाणी होणार आहेत आणि ह्या कार्यक्रमापूर्वी चार कार्यक्रमांमधून १०० महिलांचे निवड केली जाईल ज्यांना पाचवा कार्यक्रमाच्या फायनल मध्ये प्रवेश असेल पाचवा फायनल कार्यक्रमांमधील बक्षीस हे वेगळे असतील व चारही कार्यक्रमांमध्ये तीन बक्षीस व ७ लकी ड्रॉ ह्या काढले जातील व त्यांना बक्षीस दिले जाणार आहे त्यातील पहिला कार्यक्रम हा साई नगर मामुर्डी भागात दि.२७ फेब्रुवारी २००२२ रोजी संपन्न झाला ६०० ते ७०० महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला दिपक भाऊ मधुकर भोंडवे यांनी साई नगर मामुर्डी याठिकाणी प्रभाग क्रमांक २४ च्या महिलांसाठी कार्यक्रम घेतल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावरचे आनंद झळकत होता अनेक महिलांनी दिपक मधुकर भोंडवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. दिपक भाऊ मधुकर भोंडवे यांनी सर्व महिलांना संबोधित केले व सर्व महिलांचे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले व खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम यामध्ये विविध कार्यक्रम घेत त्यामध्ये उखाणे, लंगडी, धागा वेचणे, चेंडू, फेकणे रिंग, फुगा फुगवणे अशा विविध कार्यक्रमांत सोबत गाणी म्युझिक ची रंगत त्याला लावण्याची जोड अशाप्रकारे साई नगर मामुर्डी येथील प्रथम फेरी चा कार्यक्रम हा संपन्न झाला साईनगर च्या प्रथम फेरीतील तीन महिलांना आकर्षक बक्षीस व सात महिलांना लकी ड्रॉ काढून मानाची पैठणी देण्यात आली.
न्यू होम मिनिस्टर
प्रभाग क्रमांक -२४
साईनगर मधिल फेरी
१ प्रथम क्रमांक विजेते-जयश्री राजु कुर्हाडे
२ दुतिय क्रमांक विजेते-धनश्री पिंपळे
३ तृतीय क्रमांक विजेते- शोभा तिवारी
या वेळी सुनिता परदेशी,वंदनाताई तरस,पुजा मुर्गेश,प्रियंकाताई घोजगे,सुप्रियाताई दिपक भोंडवे,मोनालीताई संतोष भोंडवे,अनिता वर्मा आदि सर्व पक्षीय महिला प्रतिनिधी व पदाधिकारी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.