Home ताज्या बातम्या दिपक भोंडवे यांनी पञकारांचा पञकारदिना निमित्त केला सन्मान

दिपक भोंडवे यांनी पञकारांचा पञकारदिना निमित्त केला सन्मान

0

रावेत,दि.०७ जानेवारी २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रावेत-किवळे येथील दिपक मधुकर भोंडवे मिञ परिवाराच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भावी नगरसेवक दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांच्या हस्ते पत्रकारांना गौरविण्यात आले.यावेळी अक्षय वाघमारे,गोपी बावरा,संतोष भोंडवे,धनजय सोळुंके,संतोष सकसेना,सुनील भोंडवे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिपक भोंडवे यांनी सांगितले, की पत्रकार हा समाजाभिमूख व समाजशील असतो. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार तळमळीने करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने उचित सन्मान होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांपर्यंत विविध बाबींचा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पोहचवण्याचे काम पत्रकार उत्तमरित्या करीत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. भविष्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत,पञकार हा आपल्याला चालुघडामोडी पर्यंत पोचवतात त्यामुळे त्यांना सन्मानीत करणे हे गरजचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 11 =

error: Content is protected !!
Exit mobile version