Home ताज्या बातम्या देहरोड – रावेत येथील पिडित महिलेला ३८ लाख ८२ हजारला ...

देहरोड – रावेत येथील पिडित महिलेला ३८ लाख ८२ हजारला फसवून बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी…

0

देहुरोड-रावेत,दि.२९ डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारत मेट्रो माॅनियल या लग्नाच्या संकेतस्थळावरून ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेला ३८ लाख ८२ हजाराची फसवणूक करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, बलात्कार करताना चे फोटो व व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.सदर घटना २०१७ पासुन ते २८ डिसेंबर २०२१ पर्यंत रावेत पुणे येथे घडली असुन पिडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याने फसवणुक लक्षात आली ,घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले पीडित महिलेने तक्रार दिली. मे २०१७ मध्ये भारत मेट्रोमोनियल या लग्नाच्या संकेत स्थळावर वरुन आरोपी सचिन भाऊसाहेब गुंजाळ याने ओळख केली.झालेल्या ओळखीचा त्याने फायदा घेवुन महिला फिर्यादीस लग्नाचे अमिष दाखवुन पेट्रोल पंपाचे लायसन्स काढण्यासाठी बजाज फायनन्स मधुन ५,३०,००० / – रु . चे लोन काढणेस प्रोत्साहित केले,तर सन २०१८ ते फेब्रुवारी या दरम्यान आरोपी सचिन चा भाऊ सागर गुंजाळ याचे आय . टी . आर . प्रॉब्लेमचे निमित्त सांगुन ५,९५,००० / – रु . रोख रक्कम घेतली . तसेच आरोपी सचिन भाऊसाहेब गुंजाळ,त्याचे मित्र आरोपी श्रीकांत नरेंद्र राजे व अभिजीत पवार यांचेशी संगनमत करुन पिडित महिलेला व त्याच्या भावास बिझीनेस प्रपोजल सांगुन पार्टनरशीप फर्म प्रोसिडींग करीता पिडित महिला यांच्या काही कोर्‍या कागदपत्रावर स्वाक्षरी घेतल्या . त्यानंतर आरोपीनी हॉटेल व्यवसायाकरीता पैशांची गरज असल्याचे सांगुन पिडित महिलेला एच . डी . एफ . सी . बँकेकडुन ११,००००० / – रु . व एस . बँकेकडून ४,००००० / – रु . असे मिळुन १५,००००० / – रु . लोन घेण्यास भाग पाडले . हॉटेल व्यवसाय सप्लायर्स करीता लागणारे पेमेंट गाळयाचे भाडे व डिपॉझीट तसेच आरोपी श्रीकांत नरेंद्र राजे यांच्या खात्यावर काही रक्कम असे एकुण मिळुन ६,००,००० / – रु . पिडित महिले कडुन घेवुन आरोपी श्रीकांत नरेंद्र राजे याने त्याचे एकटयाचेच नावाने रावेत येथील हॉटेलचा करारनामा तयार करुन दि . २७/०१/२०२१ रोजी त्याने हॉटेलचा ताबा घेवुन सर्वांनी मिळुन पिडित महिला यांचे बँक लोन हफ्त्यासह एकुण ३८,८२,००० / रु . ची फसवणुक केली असुन दि . ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी सचिन गुंजाळ याने दारुचे नशेत पिडित महिलेच्या घरी येवुन ती घरी एकटीच असताना दिलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता त्याने संतापुन फिर्यादी सोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला, घडलेल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास फिर्यादी पिडित महिलेला व तिच्या भावाला मारुन टाकील आणि तुझे माझ्याकडे शारीरीक संबंधावेळचे असलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करील अशी धमकी दिली आहे.त्यामुळे पिडित महिला घाबरेल्याने पिडित महिलेने देहुरोड रावेत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली,आरोपी क्र .१) सचिन भाऊसाहेब गुंजाळ रा.दौने गुंजाळ,ता.पारनेर जि.अहमदनगर,आरोपी क्र.२)श्रीकांत नरेंद्र राजे रा. ए.विंग फ्लॅट नं.२नर्सेस काॅटर्स नर्‍हे रोड स्र्पिंग डेल शाळे जवळ,नर्‍हे गाव पुणे. आरोपी क्र.३) अभिजीत पवार रा.वाकड पुणे यांच्यावर गुन्हा रजिं ६७९/२०२१ भा.द.वि  ३७७,४२०,४०६,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस पुढील तपास करत असुन आरोपींच्या मागावर आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − seventeen =

error: Content is protected !!
Exit mobile version