मुंबई दि.07 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील समतावादी भारत साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे.त्याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय भारताचे पाहिलेले स्वप्न आणि त्यांनी प्रबळ राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनतेला खुले पत्र लिहुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची संकल्पना मांडली होती. हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मानवी हक्कांचे मिशन पूर्ण करण्याचा निर्धार करूया असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब केले चैत्यभूमी येथे महामानवाला विनम्र अभिवादन केले. यावेळी सौ सीमाताई आठवले; जित आठवले ; सखूताई आठवले आदी कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आपण देशभर पोहोचवीत असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण काम करीत आहोत.सर्वांनी एकजुटीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन पूर्ण करण्यासाठी ऐक्याचा विचार केला पाहिजे असे ना रामदास आठवले म्हणाले.
राज्यात परिवहन मंत्री असताना मी एस टी कामगारांचे प्रश्न सोडविले.त्यांना पगारवाढ दिली.त्यामुळे माझ्या काळात एसटी च्या विलीनीकरणाचा प्रश्न उदभवला नाही. मात्र आता एसटी चे कामगार विलीनीकरणासाठी संप करीत आहेत.त्यांच्यावर कठोर कारवाईची राज्य सरकार ची भूमिका निषेधार्ह आहे.कामगारांना त्यांच्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करण्याचा अधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे.कामगार आपलेच आहेत.एसटी राज्य सरकारचीच आहे. राज्य शासन लोकांचे आहे.त्यामुळे एसटी ला राज्यशासनात विलीन करण्यात काही हरकत नाही. एसटी ला राज्य शासनात विलीन करणे योग्य असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाला मार्गदर्शक आहेत.त्यांचे भाषण आणि लेखन चे 22 खंड प्रकाशित झाले आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य राज्य शासन प्रकाशित करण्यात चालढकल करीत आहे.त्यासाठीचा 5 कोटींचा कागद धूळ खात पडला आहे. ही नोषेधार्ह बाब आहे. राज्य सरकार ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन साहित्य त्वरित प्रकाशित करणे सुरू करावे अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा ना रामदास आठवले यांनी आज चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.