Home ताज्या बातम्या अन्यायाचा बंड करत इम्पेरियल ऑटो कंपनी मध्ये शिवगर्जना कामगार संघटनेची स्थापना आणि...

अन्यायाचा बंड करत इम्पेरियल ऑटो कंपनी मध्ये शिवगर्जना कामगार संघटनेची स्थापना आणि ठिय्या अंदोलन

0

निगोजे,दि.03 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-इम्पेरियल ऑटो कंपनी येथे शिवगर्जना कामगार संघटनेचे शाखेचे उद्धघाटन, इम्पेरियल ऑटो कंपनी कर्मचाऱ्यांनी शिवगर्जना कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले असुन आज सर्व संघटनेच्या सभासद कर्मचारी सर्व मिळुन संघटनेच्या बोर्डाचे इन गेटवर उद्धघाटन संस्थापक अध्यक्ष संतोष (आण्णा) बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्धाघाटन प्रसंगी संतोष बेंन्र्दे,अ‍ॅड.,पेल्हारे,अ‍ॅड.दिपक चव्हाण यांनी कामगारांना मार्गदर्शन केले,तसेच काही कामगारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांनी संघटना का शोधावी लागली,कंपनी मध्ये मॅनेजमेंट कडुन होणारा ञास आणि अन्याय हा सहन करत करत सहनशीलतेचा बांध फुटला आणि आसरा शोधण्याचे ठरले त्यामुळे आज सर्व कामगारांनी स्वताःहुन शिवगर्जना कामगार संघटनेत सामील झाले.जेवणात आळया झुरळ,तसेच हॅण्ड ग्लोज रोज देण्या ऐवजी आठ दिवसानी देणे ओर टाईम न देणे सुट्टी झाल्यास धमकी देऊन बोलुन घेणे कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणे आणि प्रेशर करणे,कोणी आले की त्यांच्या समोर दाखवतात आम्ही खुप चांगले अहोत माञ काम आम्ही करतो आम्हाला सहन करावे लागते,किवळे उत्तमनगर येथील रहीवाशी राजाराम तरस नामक कर्मचारी या कंपनीच्या इंटरनल टेशन मुळे निधन पावले आहेत,त्यांची मुलगी हजर होती तिने वडीलांना होणारा ञास सर्वान समोर व्यक्त केला.यावेळी दत्ताञय तरडे,विश्वनाथ निम्हण,अनिल जाधव,कैलास शिंदे,श्रींकांत मुर्‍हे,संदीप चुकाटे,संतोष शिवरकर,नितीन गुंजाळ,अजित पालांडे,अजित आरडे,संदिप वरड,संदीप अभंग,अरुण तुरुकमारे,उल्हास गुंजाळ,सुनिल दाभाडे,संजय म्हाळसकर,सुशांत ठोकळे,प्रतिक वैराळ,किशोर पवार आदी.कर्मचारी,संघटनेचे संभासद उपस्थित होते.आज सर्व कर्मचारी यांनी मिळुन मॅनेजमेंट विरोधात आवाज उचलत मॅनेजर पांडे आणि HR रवी दुधेकर या विरोधात तक्रार मांडली,अशा व्यक्ती मुळे कर्मचारी आणि कंपनी दोंघाचे नुकसान खरे तर यांच्या बदल्या होईला पाहिजेत.अन्याया विरोधात अवाज उठवला म्हणुन पाच कर्मचार्‍यांन विरोधात तडकाफडकी कारवाई केली.म्हणुन सर्व कर्मचारी एकवटले आहेत.बोर्डाचे उद्धघाटन करुन सर्वानी कंपनी बंद ठिय्या अंदोलन केले.जे कर्मचारी सभासद नाहीत त्यांनी कंपनीत प्रवेश केला.कोणावर ही सक्ती न करता स्वंयप्रेरणेने सर्व सहभागी झाले.मॅनेजमेंन्ट कंपनी मालकाशी कर्मचार्‍यांना बोलु देत नाहीत.स्वता मालक असल्या सारखे वागतात.फक्त सरकारी प्रोसीजर दाखवते मॅनेजमेंन्ट कंपनी वर जर पोट भरते तर कंपणी विरोधात कसे जाणार पण मॅनेजमेन्ट विरोधात हा लढा आहे,अन्याया विरोधातला हा लढा आहे.कंञाट दार सुद्धा मॅनेजमेन्ट सोबत हात मिळवणी करुन आहेत,तेही कामगारांचा विचार करत नाहीत कामगारांचा विचार केला तर ठेकेदाराचा विचार करतील अशा अनेक व्यथा कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या,अंदोलन ठप्प पाडण्यासाठी बळच भांडण काढुन दबाव आणण्या साठी कंपनीचे मॅनेजमेन्ट व कंञाटदार यांचे लोक प्रयन्त करत आहेत,कोणाकडे बघतो,काय बघतो असे बोलुन खुलेआम दहशत करत आहेत,त्यामुळे थेठ कंपनी ओनर आणि कर्मचारी समेंट घडेल का? कंपनी मॅनेजमेन्ट टिम वर कारवाई करेल का? कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करतील का? या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे,तर संपुर्ण एम आय डिसी परिसरात कंपनीच्या मॅनेजमेन्ट व्यवस्थित कर्मचार्‍यांसोबत वागत नसल्याची चर्चा पसरली आहे.

कर्मचार्‍यांच्या मागण्या:- 

मागणी क्रमांक 1 : नियुक्ती पत्र आमच्या ज्या सभासदांना आपण उत्पादनाच्या कामावर लावून देखील त्यांना कामगार संज्ञेमध्ये न बसणारी नियुक्तीपत्रे दिली आहेत . अशा सर्व कामगारांना “ ऑपरेटर पदाची ” नियुक्ती पत्रे त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून देण्यात यावीत .

मागणी क्रमांक 2 : कामगारांची बदली रद्द करणेबाबत आपल्या कंपनीने कामगारांनी संघटना स्थापन केल्याचा राग मनात धरुन अनुक्रमे 1. श्री विश्वजीत निम्हण 2. श्री . नितीन गुंजाळ 3.श्री . श्रीकांत मु – हे 4. श्री . संदिप चुकाटे या कामगारांच्या बदल्या केलेल्या आहेत , अशा कामगारांना त्वरीत त्यांच्या मुळ कामाच्या ठिकाणी पुर्वरत रुजु करुन घ्यावे तसेच बदली आदेशाच्या तारखेपासून प्रस्तुत मागणीपत्रावर निर्णय होईपर्यंत पगार देण्यात यावा .

मागणी क्रमांक 3 : बडतर्फीचा आदेश मागे घेण्याबाबत बडतर्फ़ केलेल्या कामगारांबाबत आपल्या कंपनीने आमच्या सभासद कामगारांना त्यांनी संघटना केल्याचा राग मनात धरुन श्री दत्तात्रय तरडे यांना कामावरुन तडकातडकी कोणत्याही अन्य कारणाशिवाय तसेच एकतर्फीपणे चौकशी शिवाय बडतर्फ़ केलेले आहे . अशा सभासदाला पुर्वरत कामाच्या मुळ ठिकाणी रुजु करण्यात येऊन त्यांना बडतर्फी आदेशापासुन मागणीपत्रावर निर्णय होईपर्यंत सर्व पगार देण्यात यावा . तसेच त्यांच्या सर्व सेवा शर्ती पुर्वर करण्यात याव्यात .

मागणी क्रमांक 4 : लॉकडाऊन पेमेंट आमच्या संघटनेच्या सभासद कामगारांचा आपण कोव्हीड लॉकडाऊन एप्रिल 2020 मे 2020 व जुन 2020 या 3 महिन्याचे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचे कामगारांना लॉकडाऊन काळात संपुर्ण वेतन देण्यासंदर्भातील अध्यादेश असतानाही आपण कामगारांना संपूर्ण पगाराच्या फ़क्त 50 % इतकेच वेतन दिलेले आहे . उर्वरित 50 % वेतन आमच्या सर्व सभासद कामगारांचे आपणाकडुन येणे बाकी आहे . ( प्रलंबित ) सदरील वेतन त्वरीत देण्यात यावे .

मागणी क्रमांक 5 : मुळ पगार ( Basic pay ) सर्व कायमस्वरुपी कामगारांच्या मुळ पगारामध्ये दि . 1 एप्रिल 2021 पासुन दर महा प्रत्येकी 10000 / रुपयांनी नव्याने वाढ करण्यात यावी .

मागणी क्रमांक 6 : महागाई भत्ता ( D.A. ) आमचे सभासद आपल्या कंपनीत रुजु झाल्यापासून आपण त्यांना आतापर्यंत महागाई भत्ता दिलेला नाही . तरी सदरील महागाई भत्ता प्रत्येक वर्षागणिक त्याची गोळाबेरीज करून मागील संपुर्ण फ़रकासह महागाई भत्ता देण्यात यावा . व त्यामध्ये नव्याने दर महा 6000 / – रुपयांनी वाढ करण्यात यावी .

मागणी क्रमांक 7: बदलता महागाई भत्ता – ( VDA ) आमचे सभासद आपल्या कंपनीत रुजु झाल्यापासून आपण त्यांना आतापर्यंत बदलता महागाई भत्ता दिलेला नाही . सद्य स्थितीमध्ये आपल्या कंपनीमध्ये ही प्रथा चालू नाही . तरी आत्तापर्यंतचा बदलता महागाई भत्याची प्रत्येक वर्षागणिक त्याची गोळाबेरीज करुन मागील संपुर्ण फ़रकासह बदलता महागाई भत्ता देण्यात यावा .

मागणी क्रमांक 8 : घरभाडे भत्ता ( House Rent Allowance ) सध्या अस्तित्वात असलेल्या महागाई भत्त्यामध्ये दि . 1 एप्रिल 2021 पासुन दर महा 5000 / – रुपयांनी वाढ करण्यात यावी .

मागणी क्रमांक 9 : गणवेश धुलाई भत्ता ( Washing Allowance ) सध्या आपणाकडे ही सुविधा अस्तित्वात नाही त्यामुळे ही सुविधा नव्याने सुरु करुन त्यामध्ये दरमहा नव्याने 2000 / – रुपयांनी वाढ करावी .

मागणी क्रमांक 10 : शैक्षणिकभत्ता ( Education Allowance ) सध्या आपणाकडे ही सुविधा अस्तित्वात नाही त्यामुळे ही सुविधा नव्याने सुरु करुन त्यामध्ये दरमहा नव्याने 2000 / – रुपयांनी वाढ करावी

मागणी क्रमांक 11 : वैदयकिय भत्ता ( Medical Allowance ] सध्या आपण देत असलेल्या वैद्यकिय भत्ता खूपच कमी असल्याने त्यामध्ये नव्याने 2000 / – रुपयांनी वाढ करावी . .

मागणी क्रमांक 12 : रजा प्रवास सहाय्य ( Leave Travel Assistance ) सध्या अस्तित्वात असलेला LTA हा सी टी सी चा भाग आहे . व मिळणारा LTA आपण कामगारांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये देत आहात . देत असलेली रक्कम चुकीची असून ती दुरुस्त करून सर्व सभासद कामगारांना वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्यामध्ये देण्यात यावी व सद्य स्थितीत असलेल्या LTA ची प्रत्येक महिन्यागणिक पगारामध्ये मिळणारी एकूण रक्कम 800 / रुपये ते 1000 / – रुपये च्या जवळपास आहे . मिळणारी रक्कम अत्यल्प असल्याने त्यामध्ये दि . 1 एप्रिल 2021 पासून नव्याने महिन्या गणिक 3000 / – रुपयांनी वाढ करण्यात यावी . मात्र या करीता सदर कामगाराने पूर्व मंजुर किमान ३ दिवसाची हक्काची रजा घेणे त्याचेवर बंधनकारक राहिल . एखादया वर्षी जर कामगार रजा प्रवास सहाय्य उपभोगु शकला नाही तर ती रक्कम पुढील वर्षाच्या रजा प्रवास सहाय्य रकमेमध्ये मिळवण्याची त्यास मुभा राहील .

मागणी क्रमांक 13 : विविध पाळ्यामधील कामांचा भत्ता ( Shift Duty Allowance )

1 ) 1 एप्रिल 2021 पासुन सर्व कामगारांना विविध पाळ्यामध्ये काम करावे लागत असल्यामुळे त्यांना पहिल्या पाळीमध्ये तसेच जनरल पाळीमध्ये कामावर असणा – या कामगारांकरीता प्रत्येक दिवशी 40 रुपये भत्ता देण्यात यावा . 2 ) दुस – या पाळीमध्ये कामावर असणा – या कामगारांकरीता प्रत्येक दिवशी 60 रुपये भत्ता देण्यात यावा .

3 ) तिस – या पाळीमध्ये कामावर असणा – या कामगारांकरीता प्रत्येक दिवशी 90 रुपये भत्ता देण्यात यावा . या प्रमाणे प्रत्येक दिवसागणिक शिप्ट अलाऊंन्स देण्यात यावा.

मागणी क्रमांक 14 : शिक्षणासाठी आगाऊ रक्कम (Education Advance ) प्रत्येक सभासद कामगाराच्या पाल्याच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये शाळा अथवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवेशासाठी ज्या ज्या सभासदांना आवश्यकता भासेल , त्यांना 25000 / – रुपये आगाऊ रक्कम देण्यात यावी व त्याची परतफ़ेड दहा महिन्यामध्ये करण्यात यावी .

मागणी क्रमांक 15 : ट्रान्स्पोर्ट सुविधा आमचे सर्व सभासद कामगार आपल्या कंपनीपासून सुमारे 25 ते 30 km अंतरावरती वास्तव्यास असून ते कंपनीमध्ये सद्य स्थितीत स्वतःच्या दुचाकी वाहनाने ये – जा करीत आहेत . परंतु हायवेवरती अपघाताचे प्रमाण खूपच वाढल्याने व इंधनाचे ही दर खूपच वाढल्याने सद्य स्थितीत आपण देत असलेला भत्ता खुपच कमी असल्याने त्यामध्ये दरमहा नव्याने 12000 / – रुपयांनी दि . 1 एप्रिल 2021 पासून वाढ करण्यात यावी .

मागणी क्रमांक 16 : फरकांची रक्कम ( Payment of Arrears ) करारातील समझोत्यांच्या कलमानुसार कामगारांना देय असलेली फरकाची रक्कम करारनाम्यानुसार स्वाक्षरी झालेल्या दिवसापासून 7 दिवसांच्या आत कंपनीने अदा करावी .

मागणी क्रमांक 17 : कराराचा कालावधी ( Period Of Settlement ) सदरच्या होणा – या कराराचा कालावधी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 या 3 वर्षाकरीता लागू राहिल

मागणी क्रमांक 18 : जादा कामाचा पगार (Over Time ) आपल्या कंपनीच्या स्थापनेपासून सुमारे 2002 सालापासून आपण कामगारांची व कामगार कायद्यांची पायमल्ली करत आलेला आहात . फॅक्टरीज Act 1948 , Section 58-59 चे आपण उल्लंघन करत आहात . आमच्या संघटनेचे सर्व सभासद कामगार आपल्या कंपनीत कामास आपण नियुक्त केल्यापासून त्यांनी केलेल्या ज्यादा कामाचे तास आपण त्यांच्या मासिक पगाराच्या पे- स्लिप मध्ये दर्शवित नसून त्याची आपण फ़सवणूक करीत आहात.ज्यादा कामाचा मोबदला आपण त्यांना फ़क्त सिंगल दराने देत असून ते चुकीचे असून कामगाराचा दररोजचा असलेल्या संपूर्ण पगाराच्या दुप्पट दराने देण्यात यावा . तसेच केलेल्या कामाचे तास पे स्लिप मध्ये दर्शविण्यात यावेत . तसेच आमचे सभासद कामावरती नियुक्त झाल्यापासून ज्यादा कामाचा मोबदला फ़ॅक्टरीज अॅक्टच्या तरतुदीनुसार त्याचा हिशोब करुन मागील संपुर्ण फ़रकानुसार देण्यात यावा .

मागणी क्रमांक 19 : मुदतीचे कर्ज ( Term Loan ) कामगारांचे 7 पगार अथवा 2 लाख रु या पैकी जास्तीत जास्त रक्कम प्रत्येक कामगारास नविन घर , घराचे नुतनीकरण घरगुती वापराच्या वस्तु मुलांच्या ऊच्च शिक्षणासाठी मुलीच्या अथवा बहिणीच्या लग्नासाठी , व्याजरहित मुदतीचे कर्ज म्हणुन देण्यात यावे . व त्याची परतफेड जास्तीत जास्त 40 हप्त्याने करण्यात यावी तसेच कर्ज घेण्यासाठी कसलीही अट नसावी .

मागणी क्रमांक 20 : बाहेरील संस्थेकडून कर्ज काढण्याकरता पत्र अथवा दाखला देणे एखाद्या कामगाराला बाहेरील वित्तीय संस्थेकडुन कर्ज काढण्याची आवश्यकता भासल्यास कंपनीने सदर वित्तीय संस्थेस ज्या कागद पत्रांची आवश्यकता भासेल ती कंपनीने द्यावीत आणि त्या कामगाराला जास्तीत जास्त कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करावी तसेच कर्जाच्या रकमेचा हप्ता कामगारांच्या मासिक पगारातुन कापुन वित्तीय संस्थेस थेट पाठविण्याची हमी घ्यावी .

मागणी क्रमांक 21 : दुखवटा सुट्टी संघटनेच्या सभासद कामगारांच्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यु झाल्यास त्या सभासद कामगारास दशक्रिया विधी , तेरावा विधी होईपर्यंत त्यास दुखवटा रजा म्हणून कंपनीकडून साधरणःता 15 दिवसांची पगारी सुट्टी देण्यात यावी .

मागणी क्रमांक 22 : वार्षिक स्नेह संम्मेलन ( Yearly Festival ) 2 आपल्या कंपनीची स्थापना होवून सुमारे 19 वर्षे पूर्ण झालेली आहेत . परंतु आपण अद्याप पर्यंत इंम्पेरिअल अॅटो इंडस्ट्रिज लि . कंपनी परिवारीवाचे एकदाही वार्षिक स्नेह संम्मेलन आयोजित केलेले नाहीत . तरी या पुढे प्रत्येक वर्ष कंपनीतील सर्वच ऑफ़िसर व कामगार वर्ग तसेच त्यांचे कुटुंब यांचे एकत्रित कौटुंबिक स्नेह संम्मेलन आयोजित करण्यात यावे त्याचा सर्व खर्च व्यवस्थापनाने करावा . त्या संदर्भातील सर्व नियोजनाची चर्चा संघटनेसोबत करावी . स्नेह संम्मेलनामध्ये खालील बाबींचा समावेश असावा , स्नेह संम्मेलन हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये आयोजित करावे . 1 2 सर्व कामगारांना सह परिवार ( पत्नी , मुले , आई वडिल , भाऊ , बहीण ) येण्यासाठी मुभा मिळावी , 3. स्नेह संम्मेलनाला येणा – या प्रत्येक कुटुंबाला गिफ्ट देण्यात यावे 4. स्नेह संम्मेलनामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम , लहान मुलांसाठी खेळणी , व सदर कार्यक्रमास येणा – या सर्व कुटुंबांकरीता भोजन व्यवस्था आयोजित करावी .

मागणी क्रमांक 23 : अपघात विमा ( Accident Insurance Policy ) प्रत्येक कामगारांस कंपनीच्या आवारात कंपनीच्या बाहेर ड्युटीवर असताना कामावर येत जात असतांना अपघात झाल्यास संरक्षण मिळण्याकरीता प्रत्येकी 15 लाखाचा विमा कंपनीने ऊतरवावा , सदर विम्याचा हप्ता भरण्याची जबाबदारी कंपनीची राहिल .

मागणी क्रमांक 24 : मेडिक्लेम पॉलिसी ( Mediclaim Policy ) सध्या आपण फ़क्त कामगारासच मेडिक्लेम पॉलिसीची सुविधा दिलेली आहे व त्यामध्येही आपण येणा – या पॉलिसी हप्त्याची 50 % रक्कम ही कामगारांच्याच पगारातुन कपात करत आहात . सध्या अस्तिस्त्वार असलेल्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कामगारावर अवलंबुन असलेल्या त्याच्या पत्निचा व मुला – मुलींचा व आई वडिलांचा नव्याने सामावेश करावा . सदरील पॉलिसीची सारांशीत रक्कम 500000 / – ( पाच लाख रुपये इतकी असावी . व सदर पॉलिसीची हप्ता भरण्याची जबाबदारी कंपनीची राहिल .सर्व कामगारांच्या वर्षातुन दोन वेळा सर्वप्रकारच्या वैद्यकिय चाचण्या कंपनी बाहेर चांगल्या हॉस्पीटल मध्ये कराव्यात व त्याचा सर्व खर्च कंपनीने करावा . एखाद्या व्यक्तीची हॉस्पीटल मध्ये शस्त्रक्रीया झाल्यास व त्याला हॉस्पीटल मधुन घरी पाठविल्यानंतर पुर्ण पणे आजार मुक्त होईपर्यतचा औषधाचा खर्च त्या मेडिक्लेम पॉलिसीच्या अंतर्गत करण्यात यावा . वा कंपनीने करावा .

मागणी क्रमांक 25 : मृत कामगारांच्या कुटुंबाला मदत ( Employees Death Benefit ) ज्यावेळी एखादा सभासद कामगार सेवेत असताना त्याचा दुर्देवी मृत्यु झाल्यास व्यवस्थापनाने सर्व कामगारांच्या त्या महिन्याच्या पगारातुन दोन दिवसाचा पगार कपात करावा व जमा होणा – या रकमेच्या 5 पट इतकी रक्कम कंपनीने मयत कुटूंबाच्या वारसास पुढील 10 दिवसामध्ये द्यावी . तसेच कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व फायदे मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारची मदत व्यवस्थापनाने करावी .

मागणी क्रमांक 26 : मृत , निवृत्त कामगारांच्या मुलास , वारसास नोकरी ܀ सेवेत असताना एखाद्या सभासद कामगाराचा कंपनीच्या आवारात वा बाहेर नैसर्गिक व अपघाती मृत्यु झाल्यास अथवा वयोमानाने निवृत्त झालेल्या कामगारांच्या मुलास , वारसास किंवा जवळच्या नातेवाईकास कंपनीच्या कायमस्वरुपी सेवेमध्ये सामाविष्ठ करुन घावे . तसेच एखाद्या कामगारास कायमस्वरुपीचे अपंगत्व आल्यास व तो कामगार काम करण्यास अपात्र असल्यास त्याला डेथ बेनिफीटचे सर्व फायदे देण्यात यावेत व त्याच्या मुलास , वारसास किंवा जवळच्या नातेवाईकास कायम स्वरुपी नोकरीमध्ये समाविष्ट करावे व सेवा करण्याची संधी द्यावी .

मागणी क्रमांक 27 : गणवेश ( Uniforms ) प्रत्येक कामगारांस खाली नमुद केल्या नुसार प्रतिवर्षी गणवेश देण्यात यावा , 4 जोडी शर्ट आणि 4 फुल पॅण्ट आणि 2 टी शर्ट देण्यात यावे

1 2 2 जोडी सेफ़्टी शुज व 2 जोडी सॉक्स 3 ज्या ठिकाणी अॅप्रॉनची आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्या सभासद कामगारास वर्षातून 2 ॲप्रॉन देण्यात यावेत . 4 पावसाळयापुर्वी 1 छत्री , एक टु ईन वन जॅकेट कंपनीच्या लोगोसहीत देण्यात यावे 5 दर तिमाहीस एक नॅपकीन व प्रतिमास 2 स्नानाचे व 2 कपडे धुण्याचे साबण देण्यात यावेत . 6 प्रत्येक वर्षीच्या होणा – या सेफ्टी विक मध्ये सर्व कामगारांना एक विशेष टी शर्ट देण्यात यावा .

मागणी क्रमांक 28 : रजा ( Leaves ) अ ) राष्ट्रीय आणि सणाच्या सुट्ट्या ( National & Festival Holiday ) दि . 1 एप्रिल 2021 पासुन प्रत्येक कामगाराला वर्षातुन 5 राष्ट्रीय आणि सणाच्या सुट्टया वाढवुन देण्यात याव्यात . ब ) किरकोळ रजा ( Casual Leave ) दि . 1 एप्रिल 2021 पासुन प्रत्येक कामगाराला वर्षातुन 5 किरकोळ रजा वाढवून देण्यात याव्यात .क ) वैदयकीय रजा ( Sick Leave ) दि . 1 एप्रिल 2021 पासुन प्रत्येक कामगाराला वर्षातुन 3 वैद्यकीय रजा वाढवून देण्यात याव्यात , वर्षा अखेर बाकी राहिलेल्या किरकोळ रजा रोखीत वाटण्याची मुभा कामगारांना असावी . व त्याचा हिशोब कामगारांच्या एका दिवसाच्या संपूर्ण पगारावरती करण्यात यावा . हक्काची रजा ( Privilege Leave ) दि 1 एप्रिल 2021 पासून प्रत्येक कामगाराला वार्षिक 5 दिवस हक्काची रजा वाढवुन देण्यात याव्यात . सदर रजा 120 दिवसापर्यंत साठवण्याची मुभा कामगारांना असावी . त्याचा हिशोब कामगारांच्या एका दिवसाच्या संपूर्ण पगारावरती करण्यात यावा . सध्य स्थितीमध्ये कामगारांनी किरकोळ रजा व हक्काची रजा घेतल्यास त्याने घेतलेल्या रजेमध्ये त्याच्या आठवड्याची साप्ताहित सुट्टी आल्यास आपण ती न देता त्यांच्या कडून एक अतिरिक्त रजा कपात करून घेत आहात . सदर प्रथा बेकायदेशीर असून त्वरीत बंद करण्यात यावी .

मागणी क्रमांक 29 : मातृत्व पितृत्व रजा दि 1 एप्रिल 2021 पासून प्रत्येक पुरुष कामगाराला 5 दिवस पितृत्व रजा बालकांच्या जन्माअगोदर किंवा नंतर देण्यात याव्यात .

मागणी क्रमांक 30 : ऊपहारगृहाची सोय ( Canteen सद्य स्थितीमध्ये आपण उपहार गृहाची सुविधा देत असुन सर्व कामगारांना चहा , अल्पोपहार , फराळ जेवण इ . करीता 100 टक्के अर्थसहाय्यासहीत ऊपहारगृहाची सेवा देण्यात यावी . A 1 आठवड्याचा मेनु जेवण नाष्टा फिक्स करण्यात यावा . त्या संबंधीत काही बदल करावयाचा असल्यास त्याच्या अगोदर त्या संदर्भातील चर्चा संघटनेच्या प्रतिनिधीबरोबर करावी . 2. आठवड्यातुन दोन वेळेस जेवणामध्ये स्वीट श्रीखंड , आम्रखंड , बासुंदी , इ . चा समावेश करावा … 3 सार्वजनिक ऊपवासाच्या दिवशी ज्या लोकांचा ऊपवास असतो त्यांना जेवणामध्ये खिचडी शेंगदाना आमटी , खजुर राजगीरा लाडु शेंगदाना लाडु दही केळी , वेफर्स यांचा समावेश करावा 4 नाईट शिफ्टमध्ये बेकरी पदार्थ आहे त्या प्रमाणे चालु ठेवुन त्यामध्ये वाढीव एकग्लास गरम दुध व ऊकडलेली दोन अंडी चालु करण्यात यावी . 5 ऊन्हाळयामध्ये फेब्रुवारी महीन्यापासुन ऊन्हाळयापर्यंत पहील्या आणि दुस – या शिप्टला टी बेकमध्ये चहा ऐवजी थंड लिंबू सरबत देण्यात याव.

मागणी क्रमांक 31 : वार्षिक सहल सर्व कामगारांसाठी वर्षातुन एक वेळा दोन दिवसांची सहल आयोजित करण्यात यावी व त्याचा सर्व खर्च व्यवस्थापनाने करावा .

मागणी क्रमांक 32 : कंपनी बाहेर काम जर एखादा सभासद कामगार कंपनीच्या कामानिमित्त कंपनीच्या बाहेर काम करण्यासाठी गेला तर त्यास होणा – या खर्चा व्यतिरिक्त 2000 / – रु प्रतिदिन भत्ता देण्यात यावा ,

मागणी क्रमांक 33 : स्थानिक भाषेला प्राधान्य संघटनेसंबंधीत सर्व व्यवहार स्थानिक भाषेत म्हणजेच मराठी भाषेत करण्यात यावा . उदा कंपनीत लावत असलेल्या नोटीस , कराराच्या मिटींगचा वृत्तांत तसेच कराराची प्रतही मराठी भाषेत करण्यात यावी व तिच ग्राह्य धरण्यात यावी .

मागणी क्रमांक 34 : संघटनेचे काम करण्याकरीता सवलत संघटनेच्या कमिटीवरील सदस्यांना ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या त्या वेळी संघटनेच्या कामाकरीता भरपगारी रजेची सवलत देण्यात यावी तसेच त्यांना येण्या जाण्यासाठी वाहनाची व जेवणाची व्यवस्था कंपनीने करावी ,

मागणी क्रमांक 35 : फरकांची रक्कम ( Payment of Arrears ) करारातील समझोत्यांच्या कलमानुसार कामगारांना देय असलेली फरकाची रक्कम करारनाम्यानुसार स्वाक्षरी झालेल्या दिनांकापासुन 7 दिवसांच्या आत कंपनीने अदा करावी .
मागणी क्रमांक 36 : सद्दया प्रचलीत असलेल्या प्रथा आणि सुविधांबाबत पुर्वीच्या प्रथेनुसार कामकाजाच्या पध्दतीनुसार एकमेकाच्या सलोख्याने चालु असलेल्या सर्व सेवासुविधा आणि कामगाराला मिळत असलेले फायदे ज्याचे बाबतीत या करारनाम्यामध्ये वाढ , घट , अथवा बदल करण्यात आलेली नाही . ते सर्व फायदे आणि सुविधा कोणत्याही परिणामा शिवाय अव्याहत चालु राहतील . तसेच सरकारी नियमानुसार जे काही इतर सर्व सुविधामध्ये बदल होतील ते सर्व वाढीव फायदे कामगारांना लागु करावे .

मागणी क्रमांक 37 : इतर मागण्याः ( Other Demands ) 1 ) उत्पादन विभागामध्ये लाईन लेआऊट अथवा एखादी मशिन शिफ्टींग करण्या अगोदर संघटनेच्या पदाधिका यांची चर्चा करावी . 2 ) एखाद्या लाईनवर नविन मशिन आणन्यात आली अथवा एखाद्या मशिनमध्ये सुधारणा करून त्याची उत्पादन क्षमता वाढवली तर त्याचे नॉर्मस ठरवण्या अगोदर व्यवस्थापनाने त्या संदर्भातिल सर्व चर्चा संघटनेच्या पदाधिका – यांशी करावी व नंतर नॉर्म ठरवावे . 3 ) कामगारांच्या मेडीक्लेम सुविधेसंबंधीत काही निर्णय घ्यावयाचा असल्यास संघटनेच्या पदाधिका – यांशी चर्चा करावी . 4 ) कंपनीमध्ये नविन लाईन अथवा मशिनच्या ट्रेनिंगसाठी व्यवस्थापनाचे काही लोकबाहेर जातात त्यांच्या बरोबर त्या लाईन अथवा मशिनशी संबंधीत कामगाराला सुद्धा ट्रेनिगसाठी पाठविण्यास प्राधान्य देण्यात यावे . 5 ) कामगार कामावर हजर असताना अकस्मात घरी जावे लागल्यास त्यास सोडण्यासाठी वाहनाची सोय कंपनीने करावी . कामगार हक्काच्या रजेवर गेल्यास त्या रजेमध्ये पेड हॉलिडे किंवा साप्ताहिक सुट्टी आल्यास त्या हक्काच्या रजामध्ये पकडु नयेत . 6 ) संघटनेच्या सर्व सभासद कामगारांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत वा सहकारी बँकेमध्ये जमा करावा तसेच लोनच्या हप्त्याची रक्कम , एल आय सी च्या हप्त्याची रक्कम संबंधीत कामगारांच्या पगारातुन कापुन संबंधीत बँकेत अथवा वित्तीय संस्थेत थेट जमा करण्यात यावे 7 ) कंपनीत 24 तासाच्या कालावधीसाठी डीसपेंसरी चालु करण्यात यावी .

मागणी क्रमांक 38 : संघटनेचा हक्क ( Union Rights ) संघटना या मागणी पत्रात नमुद केलेल्या मागण्यामध्ये चर्चेच्या कराराच्या वेळी बदल करण्याचे हक्क अबाधीत ठेवत आहे .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version