देहुरोड,दि.१४ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गटबाजीने पुन्हा काढले तोंड वर,चक्क देहूरोड शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे यांना डावलून लावले जातात कार्यक्रम देहूरोड शहरात शहराध्यक्ष च महत्व कमी करून राष्ट्रवादी संपवण्याचा हा कुणाचा आहे कुटील कारस्थान डाव. शहरातील घडामोडींवर आत्तापर्यंत शहराध्यक्षांनी कामकाज केले आहे. मात्र येणार्या निवडणुकीच्या टप्प्यावर शहराध्यक्ष ना डावलुन राष्ट्रवादीला कमजोर करण्याचे काम देहुरोड शहरातील अनेक बडे नेते व माजी अध्यक्ष पदाधिकारी करत आहेत याची प्रचिती देहूरोड शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे यांनी काढलेल्या खुलासा पत्रकातून समजून येत आहे.वरिष्ठ पक्षश्रेष्ठी यावर लक्ष घालून राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे यांच्या पाठीशी उभे राहतील का याकडे संपूर्ण देहूरोड शहराचे लक्ष लागून आहे.
शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे यांनी लिहिलेले पत्रातील खुलासा
देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी आशिष बन्सल यांची तालुका युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे यांनी नेमणुकीचे पत्र दिले असून त्याबाबत देहूरोड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ट नेते यदुनाथ डाखोरे , मा.अध्यक्ष मिक्की कोचर व इतर यांनी पत्रकार परीषद सोमवार दि . ११/१०/२०२१ रोजी सायंकाळी घेतली होती . सदर पत्रकार परीषदेस माझी कोणतीही संमती नव्हती व नाही . तसेच पत्रकार परीषदेस उपस्थित कार्यकर्त्यांना फक्त “ युवक अध्यक्ष निवड ” हि बेकायदेशीररित्या कोणालाही विश्वासात न घेता व वरिष्ठांच्या आदेशाविरूध्द केली आहे त्यास विरोध दर्शविण्यासाठी असे सांगितले परंतु सदर पत्रकार परीषदेत इतर विषय तसेच वैयक्तीक टिका – टिपणी व नेमणुक याबाबत केलेली वक्तव्य व माहिती मला व उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मान्य नव्हती व नाही घेतलेली पत्रकार परीषद व त्यामधील इतर विषयांस विरोध होता व आहे .असे प्रसिद्धी पञकाद्वारे राष्र्टवादीचे देहुरोड शहर अध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे यांनी कळवले आहे.