पिंपरी चिंचवड, दि.08 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– सौदर्य आणि बुद्धीमत्तेचा कस पणाला लावून पिंपरी चिंचवड परिसरातील महिला आणि लहान मुलांनी पीसीएमसी ग्लोबल स्पर्धा उत्साहात पार पाडली. फ़ॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात राज्य आणि देशासह परदेशातही ज्यांना भरारी घ्यायची आहे. अशांना हि स्पर्धा प्राथमिक स्तरावर प्रेरणादायी ठरत आहे. महिला आणि लहान मुले, मुली गटात करिष्मा माने, टीना क्षत्रिय, सप्तश्री उगले व पलक सुपे हे पीसीएमसी ग्लोबल स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. निगडी येथील सिसन्स बॅन्क्वेट्स हॉलमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेमध्ये 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचे आयोजन कशिश प्रोडक्शन तर्फे करण्यात आले होते. कोरिओग्राफर योगेश पवार, शो डायरेक्टर दिपाली खमर, सह कोरिओग्राफर अंजली रघुनाथ वाघ व नम्रता सन्नासी व यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेची तयारी रावेतमधील गोल्ड्स जिम मध्ये झाली तर पिंपरीतील लॅक्मे अकादमीतर्फे स्पर्धकांचे मेकअप केले गेले.
प्रियंका मिसाळ, मुग्धा देशपांडे, क्षमा धुमाळ व प्रसाद खैरे असे दिग्गज या स्पर्धेला जुरी मान्यवर म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे सुत्रसंचालन महेश सोनी यांनी केले.
पुष्मा नंदी, सुषमा सुतार, वैभवी गोसावी, आयुशी देशपांडे, सिद्धी शिंदे, न्याती मते, अनय सुपे, स्वरा बाजारे, रिदम राज्यगुरू व श्रृष्टी वानखेडे हे उपविजेते ठरले आहेत.
आयोजक योगेश पवार म्हणाले की, केवळ सौंदर्य किंवा बुद्धीमत्ता असून त्याचा उपयोग नसतो, त्याचे उत्तम सादरीकरण करण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता असते. कशिश प्रोडक्शनतर्फे आत्ता पर्यंत 5200 मॉडेल्सला विविध स्पर्धेसाठी तयार केले आहे आणि यामुळेच आम्ही फॅशन इंडस्ट्री मध्ये मोठी झेप घेतली आहे. पिंपरी-चिंचवडमधील नवोदीत स्पर्धकांसाठी जागतिक पातळीवरील विविध स्पर्धांच्या रंगमंचावर अधिक आत्मविश्वासाने वावरण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.