Home ताज्या बातम्या फुकट पगार घेणार्‍या व थम करुन गायब होणार्‍या पालिका कर्मचार्‍यानवर कारवाही करणार-...

फुकट पगार घेणार्‍या व थम करुन गायब होणार्‍या पालिका कर्मचार्‍यानवर कारवाही करणार- आयुक्त राजेश पाटील

0

पिंपरी, दि.२९ सप्टेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आगामी दिवाळी सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना, प्रथेनुसार द्यावयाचे ८.३३% बोनस व अधिक ज्यादा बक्षीस रक्कम रु.२०,०००/- लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी पञकार परिषदेत दिली त्याच प्रसंगी पञकारांनी प्रश्न उपस्थित केला निर्णय हा चांगला आहे जे प्रामाणीक कामगार आहेत त्यानां दिलेच पाहिजे परंतु महा पालिकेचे परमंनट अदांजे ३०० ते ४०० कामगार काम न करता वर्षानुवर्ष फुकट पगार घेत आहेत,ते राजकीय नेत्यांच्या नगरसेवकांच्या,पदाधिकार्‍यांच्या मागे व सोबत फिरतात.व लवकर येऊन थम करुन गायब होतात,व संध्याकाळी उशिरा थम करुन जातात.थम नव्हते त्यावा महिन्यातुन आठवडयातुन एकदा येऊन मस्टर वर सही करयाचे,वरीष्ट अधिकारी, विभाग प्रमुख मदत करतात व कान्हा डोळा करतात त्यावर काय निर्णय घेणार असे विचारले असता आयुक्तांनी थेट कारवाहीचे माझे काम चालु आहे निश्चित तुम्ही बोलण्या आधीच मी सर्वे सुरु केला आहे,नागरीकांनीही तक्रारी कराव्यात व अशा बेभरोस्या कामगांरांना चपराक दिली पाहिजे.मी कारवाही करताना मागे पुढे पाहणार नाही अशी तंबी या वेळी आयुक्तांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांचे कोरोना संकटाच्या काळातील योगदान तसेच शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेता प्रथेनुसार त्यांना दिवाळीकरिता देण्यात येणारे ८.३३% बोनस व अधिक ज्यादा बक्षीस रक्कम रु.२०,०००/- लाभ देण्याचा निर्णय तसेच पुढील पाच म्हणजेच सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ वर्षांकरिता नवीन करार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी जाहिर केले
महापौर यांचे दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील,नगरसेवक संदिप वाघीरे तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व इतर पदाधिकारी, सहकारी आदि उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − five =

error: Content is protected !!
Exit mobile version