पिंपरी,दि.29 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विद्यार्थ्यामध्ये नाराजी असल्याने विद्यार्थी फि माफी साठी महिविद्यालयात जात होते माञ त्यावर प्राचार्य आणि विद्यार्थ्यामध्ये बाचाबाची झाली त्यावर शुभम नावाच्या विद्यार्थ्याने स्वताचे डोके दरवाजावर आपटुन फोडुन घेतले तदनंतर कर्मचारी यांनी शुभमला मारहाण केली त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण सर्व विद्यार्थी मध्ये झाली त्यामुळे विद्यार्थी एकञ येत अंदोलन केले.विद्यार्थ्याला मारहाण झाली बातमी झपाट्याने शहरभर पसरली, एक कर्मचारी आणि विद्यार्थी जखमी झालेत,प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी झालेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त केली व विद्यार्थ्यावर बाहेर काही हाणामारीचा प्रकार झालेला असल्यास महाविद्यालय त्याच्यावरती कठोर कारवाई करेल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्राचार्यांच्या दालना बाहेर भर पावसामध्ये आंदोलन केले विद्यार्थ्याचा रक्ताने माखलेला रुमाल घेऊन प्राचार्यांच्या केबिन बाहेर जोराने प्राचार्यांच्या विरोधात व महाविद्यालयाचे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला विद्यार्थ्यांनी प्राचार्य व महाविद्यालय प्रशासनामध्ये झालेल्या वादामध्ये विद्यार्थ्यांनमध्ये प्रचंड रोष दिसत होता.
50 टक्के फि माफ करण्याचे आश्वासन प्राचार्य गायकवाड यांनी दिले,शुभम व इतर विद्यार्थ्यांची फी माफ करावी असा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मागणी होती तर तिसऱ्या वर्षाची फी प्राचार्यांनी 50% माफ केले असून 50 टक्के ही ऑडिट अनुसार भरावी लागेल असे सांगितले. मारहाण झालेल्या व जखमी झालेल्या शुभम वर मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे विद्यार्थ्यांची मागणी वरती प्राचार्यांनी पोलीस प्रशासन व महाविद्यालय ही कारवाई करेल तसेच महाविद्यालयातील संपूर्ण सीसीटीव्ही त्वरित चालू करण्याचे आश्वासन दिले संबंधित झालेला संपूर्ण प्रकार हा महाविद्यालयीन परिसरामध्ये एक निंदणीय अशी घटना होती त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात महाविद्यालयांमध्ये घडलेल्या प्रकारा बदल तसेच प्राचार्य व महाविद्यालयातील प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड तीव्र नाराजी दिसून आली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक संजोग वाघेरे हे या महाविद्यालयातील शालेय समिती बॉडीवर असल्याने त्यांनी त्वरित महाविद्यालयात येऊन विद्यार्थी व प्राचार्य यांच्यामधला वाद निवळून प्राचार्य व विद्यार्थ्यांमध्ये समेट घडवून आणला प्राचार्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले शुभम बारुत याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले व तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यालाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत.