Home ताज्या बातम्या मैत्रीणीसोबत संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार देणारे बलात्कारी नाहीत- हायकोर्ट

मैत्रीणीसोबत संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार देणारे बलात्कारी नाहीत- हायकोर्ट

0

मुंबई,दि.२७ सप्टेबंर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मैत्रिणी बरोबर दिर्घकाळ संबंध ठेऊन ऐनवेळी लग्नाचा विचार बदलणार्या आरोपीवर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून आणि किगदपुराव्यांवरून आरोपीला खरोखरच महिलेबरोबर विवाह करायचा होता, असे स्पष्ट होत आहे. मात्र नंतर त्याने विचार बदलला आणि लग्नाला नकार दिला. यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मत औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले आहे.तीस वर्षी महिलेने आरोपीविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने लग्नाचे वचन दिले आणि त्यातून आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. तिचे नातेवाईक त्याच्या घरी बोलणी करायला गेली होती. मात्र तेव्हादेखील त्यांनी लग्नाला तयारी दर्शविली आणि कोविड परिस्थिती निवळल्यावर लग्न करू असे आरोपीकडून सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने त्याच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही फिर्याद रद्द करण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली. आमच्यामध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले होते, त्यामुळे बलात्कार आरोप होऊ शकत नाही, असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला.

न्या सुनील देशमुख आणि न्या नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबात आरोपी लग्नाला तयार होता हे स्पष्ट होते. त्यांच्या मध्ये असलेल्या प्रेमामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यामुळे आता लग्नाला नकार दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 9 =

error: Content is protected !!
Exit mobile version