Home ताज्या बातम्या MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला ; हिंदू सेनेच्या...

MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला ; हिंदू सेनेच्या ५ जणांना अटक

0

नवीदिल्ली,22 सप्टेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला करण्यात आला असुन या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हिंदू सेनेच्या ५ जणांना अटक केली. मंगळवारी संध्याकाळी ५ जणांनी ओवेसी यांच्या दिल्लीतील अशोका रोड येथील घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दारावरील नेमप्लेट आणि दरवाजा तोडण्यात आला होता. या हल्ल्यास भाजप जबाबदार असल्याचा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. भाजपने लोकांच्या मनात भेदाची भावना निर्माण केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. “एखाद्या खासदाराच्या घरावर असा हल्ला होत असेल तर यातून कोणता संदेश जातो?” असा सवालही त्यांनी विचारला आहे. आपण उत्तर प्रदेशातील प्रगतीशील समाजवादी पार्टीचे शिवपाल यादव यांना भेटण्यासाठी गेलो होतो, असेही ओवेसी यांनी सांगितले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ७ ते ८ जणांनी ओवेसी यांच्या घरावर हल्ला केला. यात घराचे गेट, खिडकीचे काच, लॅम्प, नेमप्लेट तोडण्यात आले. या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी ट्विट करुत सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आज कुछ उग्रवादी गुंडों ने मेरे दिल्ली के मकान पर तोड़-फोड़ की।इनकी बुज़दिली के चर्चे तो वैसे ही आम हैं।हमेशा की तरह, इनकी वीरता सिर्फ़ झुंड में ही दिखाई देती है।वक्त भी ऐसा चुना जब मैं घर पर नहीं था। गुंडों के हाथों में कुल्हाड़ियाँ और लकड़ियाँ थीं, घर पर पत्थर बाज़ी की गयी। मेरा नेम प्लेट तोड़ा गया और 40-साल से हमारे साथ काम करने वाले राजू के साथ मार-पीट भी की गयी। साम्प्रदायिक नारे लगाए गए और मुझे क़त्ल करने की धमकी भी दी गयी। राजू के घर में रहने वाले छोटे से बच्चे घबराए हुए हैं।झुंड में कम-अज़-कम 13 लोग थे। 6 दिल्ली पुलिस की हिरासत में हैं। प्रधानमंत्री का आवास भी मेरे घर से महज़ 8 मिनट की दूरी पर है।मैंने बार-बार पुलिस को बताया था कि मेरे मकान को निशाना बनाया जा रहा है। अगर एक सांसद का घर महफ़ूज़ नहीं तो बाक़ी शहरियों को @AmitShah क्या सन्देश देना चाहते हैं? “   या शब्दात ओवेसी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version