Home ताज्या बातम्या पि.चि.मनपात रिपाई(आठवले) पक्षाचे नगरसेवक अगामी निवडणुकीत युवक आघाडीचे असतील,तयारी सुरु झाली-युवक...

पि.चि.मनपात रिपाई(आठवले) पक्षाचे नगरसेवक अगामी निवडणुकीत युवक आघाडीचे असतील,तयारी सुरु झाली-युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ

0

पिंपरी,दि.31 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-(RPI-आठवले),रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडीची बैठक हाॅटेल अल्पाईन पिंपरी येथे पार पडली. सोमवार दि.30 ऑगस्ट 2021 रोजी मोठ्या उत्साहात पार पडली पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ बैठकीचे अध्यक्ष होते,त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात पक्ष वाढी साठी मुख्य भुमिका घेत असुन पक्ष श्रेष्ठीच्या मार्गदर्शना खाली युवक आघाडी

येत्या पिंपरी चिंचवड सार्वञिक निवडणूक 2022 मध्ये पक्षाची ताकत दाखवुन देईन ताकदीनिशी पक्षाचे नगरसेवक पालिकेत असतील असे मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
या बैठकीस रिपब्लिक पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे प्रभारी व पुणे जिल्हाध्यक्ष मा.सुर्यकांत वाघमारे, मा. चंद्रकांताताई सोनकांबळे सरचिटणीस महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी प्रमुख मार्गदर्शन केले,रिपब्लिक पक्ष हा बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आपण पक्षाचे नगरसेवक पालिकेत पाठवले पाहिजे शहरातील विविध समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे,आठवले साहेबांचे आणि पक्षाचे हात बळकट केले पाहिजे अगामी निवडणूकांनवर काम केले पाहिजे पक्षात पक्ष प्रवेक्षाचे कार्यक्रम वाढले पाहिजे,असे विविध विषयांवर मार्गदर्शन केले
यावेळी युवक आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या 8 ते 10 जागा लढविण्याचा निर्धार पक्षश्रेष्ठी समोर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक आघाडीचे पि.चि. सरचिटणीस दशरथ ठाणांबीर यांनी केले
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा.बाळासाहेब रोकडे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले होते त्यामुळे त्यांचा सन्मान सोनकांबळेताई व मा. वाघमारेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी रमेश चिमुरकर, सुधाकर वारभुवन,के एम बुक्तर, भाऊसाहेब रोकडे, सिकंदर सुर्यवंशी, बाळासाहेब रोकडे, कमलताई कांबळे,जयकांत गव्हाळे उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन बापूसाहेब वाघमारे, रमेश शिनगारे,अजय झुंबरे, केतन कांबळे, अतुल जाधव, प्रमोद वाघमैतर, योगेश गायकवाड, संदिप तोरणे,राजू वारभुवन इत्यादी कार्यकर्ते यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + fifteen =

error: Content is protected !!
Exit mobile version