Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीच्या आंदोलनावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची प्रतिक्रीया…

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची प्रतिक्रीया…

0

पिंपरी,दि.27 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- स्थायी समिती संदर्भातील उपस्थित केलेला विषय हा संपूर्ण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चौकशीचा भाग आहे. स्थायी समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशा एकुण सोळा सदस्यांचा समावेश आहे. हा सुध्दा चौकशीचा भाग आहे. संबंधित विभाग याबाबत चौकशी करीत आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भुमिका अगोदरच भाजप नेतृत्वाने स्पष्ट केलेली आहे. खरतर या पाच वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीने संपूर्ण शहराचा ‍विचार करून योग्य प्रकारे विकास कामांचे नियोजन करून मनपाचा निधी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. या पाच वर्षाच्या काळात भाजपाने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने (Below) विकासकामे केल्यामुळे मोठया प्रमाणात निधीची बचत झालेली आहे. याउलट राष्ट्रवादीच्या काळातील निविदा चढया दराने (Above) करून मनपाची लुट केली आहे. याचा हिशोब राष्ट्रवादीने द्यावा. हे एक राजकीय षडयंत्र आहे. खरतर चौकशीच करायची असेल तर पाच वर्षाचीच काय महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या सर्वच स्थायी समितींच्या कामांची चौकशी लावावी. आणि आत्तापर्यतच्या सर्वच सभापतींची नार्को टेस्ट सुध्दा करावी. खर काय ते जगासमोर नक्कीच येईल, अशी प्रतिक्रीया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version