Home ताज्या बातम्या महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष लांडगे, व माजी अध्यक्ष सावळे,गायकवाड,मडिगेरी,लोंढे यांच्या बेहहिशोबी संपत्तीची...

महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष लांडगे, व माजी अध्यक्ष सावळे,गायकवाड,मडिगेरी,लोंढे यांच्या बेहहिशोबी संपत्तीची चौकशीची मागणी

0

पिंपरी,दि.26 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रथमच इतिहासात स्थायी समिती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारला व अध्यक्षांसह कर्मचारी सापडले,व त्यामुळे शहर भर चर्चा पसरली व त्यामुळे भाजपचा भ्रष्टाचार पुढे आला,अनेक नेते सामाजीक कार्यकर्त्यांनी आधीच्या अध्यक्षांची ही चौकशी झाली पाहिजे हि मागणी जोर धरु लागली.

पिंपरी चिंचवड शहरात भाजपाला आणखी एक धक्का,स्थायी समिती विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.नितीन लांडगे यांच्या अडचणीत भर ,व माजी अध्यक्ष सीमा सावळे,ममता गायकवाड,विलास मेडिगिरी,संतोष लोंढे यांनाही अडचणीचा करावा लागणार सामना,सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब बबन वाघेरे यांनी मुख्यंमंञी उद्धव ठाकरे,उपमुख्यमंञी अजित पवार,महापालिका आयुक्त राजेश पाटील,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे(ACB) ला तक्रार/निवेदन अर्ज केला आहे.तसेच अर्ज ई-मेल केले आहेत,त्यामुळे भविष्यात थेट चौकशीला सामोरे जावे लागणार.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017च्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आणि पहिल्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे झाल्या, त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला ठेकेदारांकडून जास्त प्रमाणात टक्केवारी मागितली जाऊ लागली. काही ठेकेदारांकडून भागीदारी घेण्यात आली याची तक्रार त्यावेळेस प्रमोद साठे नामक व्यक्तीने थेट पंतप्रधान कार्यालयात केली होती. वर्तमानपत्रात सुद्धा बातम्या आल्या मात्र केंद्रात राज्यात व महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने चौकशी काही झाली नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराची रीग मोठ्या प्रमाणात वाढली.
आता 2021ला भाजपच्या पापाचा घडा भरला व लाच घेताना स्थायी समितीचा लिपिक पकडला गेला. स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांना अटक झाली त्यामुळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडिगेरी, संतोष लोंढे व विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्या संपत्तीची त्यांच्या कुटुंबाची व निकटवर्तीयांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा, तसेच 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र भरताना आता पर्यंत झालेल्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांनी संपत्तीचा लेखाजोखा दिला आहे त्यानंतर संपत्तीत किती बेहिशोबी मालमत्ता झाली त्यांच्या कुटुंबाच्या व निकटवर्तीय नातेवाईक यांच्या संपत्तीची चौकशी करावी. व दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी व योग्य ती कारवाई करा अशी मागणी पिंपरी गावचे सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब बबन वाघेरे यांनी केली आहे.

आता पर्यंतचे पि.चि.मनपा स्थायी समिती अध्यक्ष
2017- सीमा सावळे
2018-ममता गायकवाड
2019-विलास मडिगेरी
2020-संतोष लोंढे
2021-अ‍ॅड.नितीन लांडगे(विद्यमान अध्यक्ष)

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version