Home ताज्या बातम्या आयुक्त राजेश पाटील पुनावळेतील कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिंमत दाखवणार का?-...

आयुक्त राजेश पाटील पुनावळेतील कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिंमत दाखवणार का?- नगरसेवक राजु बनसोडे

0

पिंपरी,दि.27 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- काखेत कळसा गावाला वळसा आयुक्त साहेब पुनावळे येथील नियोजीत कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिम्मंत दाखवा असे अव्हान राष्र्टवादीचे नगरसेवक राजु बनसोडे यांनी थेट पालिका आयुक्त राजेश पाटील यांना केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 1997 ला पुनावळे गाव समाविष्ठ करण्यात आले, त्यानंतर पुनावळे येथील 74 एकर वनखात्याच्या जागेवर महापालिकेने कचरा डेपोचे आरक्षण टाकणेत आलेले आहे . त्या जागेचा मोबदला म्हणुन पालिकेने 4 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे जमा केलेले आहेत . तसेच पिंपरी सांडस येथे वनखात्यासाठी जागा सुचवलेली आहे, मात्र पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजूला मोठ मोठ्या बांधकाम व्यावसायीकांनी हजारो एकर जागा घेतली असल्याने गेली 23 वर्षापासुन कचरा डेपोला विरोध करण्यात येत आहे . आता पर्यंत जे जे आयुक्त महापालिकेत आले त्या सर्व आयुक्ताना याच बांधकाम व्यावसायीकांच्या बगलबच्यांनी दबाव टाकून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यात मजाव केला मात्र आयुक्त साहेब आपण तरी हि कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिम्मत दाखवावी मोशी येथील कचरा डेपोची क्षमता कधीच संपली आहे . तेथे कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत,तेथील नागरीक कचरा डेपोच्या दुर्गंधीने त्रस्त आहेत महापालिकेने पुनावळे येथील कचरा डेपोची जागा ताब्यात घेवुन तेथे आधुनिक पध्दतीचा कचरा डेपो उभारावा. जेनेकरुण पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुच्या नागरीकाना या कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही.आज पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुला हजारो गंगणचुंबी उंच उंच इमारती तयार झाल्या आहेत त्या बांधणार्‍या बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी काही राजकारणी मंडळी या कचरा डेपोला विरोध करीत आहेत.व कचरा डेपोची जागा ताब्यात घेवू नये म्हणुन प्रशासनावर आतापर्यंत दबाव आणत आहेत .आज आयुक्त साहेब आपण कचरा समस्येसाठी इंदोर दौरा काढला मात्र पुनावळे कचरा डेपो आरक्षणाच्या जागेवर आपण गेला नाहीत. “आपल्या काखेत कळसा आणी गावाला वळसा” अस झाल आहे . कचर्‍याची समस्या सोडवायची तर आयक्त साहेब आपण विरोध झुगारुन पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी बांधकाम व्यावसायीकांच्या बगलबच्यांना तोडांशी पाडावे,आपल्या कडुन होणार्‍या कारवाईची थेट चर्चा शहरभर पसरली आहे,ह्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या खुप अपेक्षा आहेत.आपण जनतेच्या प्रश्नावर लक्ष देऊन कचरा डेपोची जागा ताब्यात घ्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + fifteen =

error: Content is protected !!
Exit mobile version