वाशिम,दि.04 जुन 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्र्टात सतत स्ञी अत्याचाराच्या घटना वाढत आहेत,स्ञी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे,त्यात पोलिस महिलाही बचावल्या नाहीत असाच निदांजनक प्रकार वाशिम जिल्हात घडला आहे.नांदेडच्या पोलिस निरिक्षकाने वाशिम मधील महिला शिपायावर बलात्कार केल्याचा आरोप करत त्या नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला शिपाया सोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली असुन सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.सदर घटनेचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत.स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे वाशिम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन भा.द.वि कलम 376 व इतर नुसार आरोपी विश्वकांत गुट्टे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर आहेत. वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विश्वकांत गुट्टे 2007 मध्ये पीएसआय पदावर कार्यरत होते. त्यावेळी तक्रादार महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे आपल्या घरी आले आणि त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड या कडे असुन वाशिम पोलिस तपास करत आहेत पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी माहिती दिली.