Home ताज्या बातम्या मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई दि.14 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – महाराष्ट्रात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातील राजपूत,ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषावर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करावा तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार दिला आहे. पण राज्य सरकार ने तमाम मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करून अन्याय केला आहे.या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालून मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइं च्या शिष्टमंडळाने राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

यावेळी ना रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मा. आ सुमंत राव गायकवाड,काकासाहेब खंबाळकर,गौतम सोनवणे, अशोक भालेराव,एम एस नंदा,सुनील मोरे,युवराज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 18 =

error: Content is protected !!
Exit mobile version