पिंपरी-चिंचवड, 07 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
(द्वितीय अध्याय, श्लोक 47)
अर्थ: कर्म पर ही तुम्हारा अधिकार है, कर्म के फलों में कभी नहीं… इसलिए कर्म को फल के लिए मत करो। कर्तव्य-कर्म करने में ही तेरा अधिकार है फलों में कभी नहीं। अतः तू कर्मफल का हेतु भी मत बन और तेरी अकर्मण्यता में भी आसक्ति न हो।
मुझे ऐसा लगता है कि अच्छे कर्म से बढ़कर कोई धर्म नहीं है, जो व्यक्ति खासकर आज की परिस्थितियों में एक और व्यक्ति की मदद करे उस से बड़ा धर्मात्मा कोई नहीं…
अशी म्हत्वकांक्षा बाळगणारे आर्यन मॅन सिंघम स्टाईल अधिकारी म्हणून लोकप्रिय व जनतेच्या मनात राज्य करणारे पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कधी पहाटे सायकलवर तर कधी रनिंग करत तर कधी कुठेही अचानक असच पुन्हा शहरात वेशांतर करून पोलीस ठाण्यांवरच धाडी टाकल्या.आपल्याच सिस्टम जर व्यवस्थित नसेल तर काय फायदा अस सतत सर्वाना मार्गदर्शन करणारे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ही पोलिस खात्यात काम करणार्या सहकार्यानवर विश्वास नाही,अनेक प्रकार शहरात घडले असुन काहीना सस्पेंड ही केले.असाच पुन्हा शहरावर कसे कामकाज पोलिस अधिकारी करतात या साठी वेशांतर करुन कृष्णप्रकाश मिया जमालखान कमालखान पठाण बनुन तर सोबत मोहिमेत मियाची बिवी बनल्या सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे . दोघांनी वेशांतर केले. कृष्णप्रकाश यांना दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा विग असा लूक घेऊन. त्यात तोंडावर मास्क हे दोघं कुणाला ओळखूही आले नाहीत.अधिकाऱ्यांनी वेशांतर करून शहरांमधल्या विविध पोलीस ठाण्यांवर धाडी टाकल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी तीन ठिकाणी भेटी दिल्या आणि सत्य परिस्थितीची माहिती घेतली.
रात्री 12 च्या सुमारास खासगी टॅक्सीने पिंपरी पोलिस ठाण्यात गेले. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका हवी होती, पण फोन केला तर 8000 रुपये म्हणतात, अशी तक्रार त्यांनी केली. अॅम्बुलन्स वाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तक्रार दाखल करून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. पण पोलिस आयुक्तांनाही अगदी तसाच अनुभव आला जो सामान्य व्यक्तीला येतो. कारण ते तेव्हा सामान्याच्या वेशात होते. पोलिसांनी हे आमचं काम नाही म्हणत दोघांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मग कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून खरी ओळख दाखवताच अधिकाऱ्यांची अक्षरशः हवा टाईट झाली नंतर हिंजवडी पोलिस ठाण्याकडे गेले.रमजानचे उपवास ठेवतो, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यामुळं मी बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या, अशी खोटी तक्रार केली. हिंजवडीमध्ये ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्याने गांभीर्याने प्रकरणाची माहिती घेतली. कच्ची फिर्याद ही तयार केली आणि वरिष्ठांना बोलावतो असं सांगितलं. पण सर्व ड्रामा संपवत आयुक्तांनी ओळख दाखवल्यावर तो कर्मचारी डचकला त्याला काय बोलायच सुधरले नाही. मात्र इथंही कृष्णप्रकाश आणि कट्टे यांना चांगला अनुभव आला.रात्री 2 च्या सुमारास वाकडवरून थेट डांगे चौकातील गस्तीच्या पॉईंटकडे जाताना सर्व कर्मचारी रस्त्यावर हातात काठी घेऊन प्रत्येक वाहनाची तपासणी करताना दिसले. मात्र आम्ही वेशांतर करून फिरतोय ही बातमी पसरल्याने हा प्रामाणिकपणा दाखवत कर्तव्यावर असल्याचं आव अधिकारी आणत असल्याचंही नजरेतून सुटलं नाही असं कट्टे म्हणाल्या.एकूणच वेशांतर करून केलेली शहराची सफर दोघांसाठी थोडी खुशी थोडा गम देणारी ठरली. पोलीस कर्मचारी कसे काम करतात. नागरिकांना कशी वागणूक देतात याची तपासणी करण्यासाठी यापुढंही अशाच धाडी टाकणार असल्याचं ते म्हणाले. समाजाला त्रास होणारे काळे धंदे बंद व्हायलाच हवे, हा मुख्य उद्देश अशल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी अचानक कुठेही कधीही छापे टाकणार असल्याचं ते म्हणाले. जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. शहर भयमुक्त करायचे आहे… पोलिसांबद्दल जनतेच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण कऱणे… पोलिस लोकाभिमुख व्हावा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी अधिक आक्रमक पावले उचलणार असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.
माञ जनतेतुन यावर प्रतिक्रिया घेतली असता जनतेतुन दोन्ही अधिकार्याचे कौतुक केले जात आहे.असेच अचानक जाऊन धाक ठेवावा.व सर्व अधिकार्यानी कृष्ण प्रकाश याचा आदर्श घेऊन काम करावे