पिपंरी,दि.04 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसापासून स्पर्श हॉस्पिटल वरून गदारोळ चालू आहे नक्की काय प्रकार आहे याकडेच शहरातील जनतेच्या रुग्णांचे लक्ष लागलेले असताना बेड साठी एक लाख रुपयाची मागणी करून घेतल्या प्रकरणाची बातमी जोराने वेग धरू लागली त्यावर पालिका सभागृहात ही गोंधळ घातला गेला एकंदरीत सभागृहात पैसे घेतल्याचा पुरावा म्हणून एका नगरसेवकाने कॉल रेकॉर्ड ऐकवला त्यानुसार अनेक चर्चांना उधाण आले होते माननीय कृष्णा प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशाने कोवीड महामारी च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शासकीय व खाजगी कोवीड सेंटर वर पोलिस प्रशासनाकडून सतत भेटी देऊन सुरक्षा प्रदान करण्यात आली होती त्यादरम्यान पोलीस आयुक्तांनी महापालिकेच्या ऑटो क्लस्टर सेंटरमध्ये मोफत बेडसाठी रुग्णांकडून एक लाख रुपये घेतल्याची धक्कादायक प्रकार या बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी 30 एप्रिल 2021रोजी मिडियातील बातमी चा आधार घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे मिलिंद वाघमारे यांना चौकशीचे आदेश दिले होते पिंपरी पोलीस ठाणे कडील अधिकारी यांनी सदर घटनेबाबत संबंधित रुग्णांचे नातेवाईक यांना फोन केला असता आम्ही कोरोना संक्रमित आहोत असे कळविण्यात आले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकान कडुन तक्रार घेण्यास अडचण येते आहे हे लक्षात घेऊन माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून अखेर तक्रार दाखल करून घेण्यात आली तक्रार अर्ज पालिका आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जगताप या दोघांनीही दिला.व त्या अनुषगांने गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला तपासादरम्यान मयत श्रीमती सुरेखा अशोक वाबळे (वय-54 वर्षे)राहणार चिखली गाव पुणे यांना दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी कोरोना संक्रमण झाल्यानंतर ऑक्सी केअर हॉस्पिटल वालेकरवाडी येथे ऍडमिट करण्यात आले होते हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने व रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक यांची हालचाल चालू झाली त्यानुसार नातेवाईकांचे ओळखीचे व्यक्ती म्हणून बालाजी मोरे व मोरेंच्या ओळखीचे डॉक्टर सचिन कसबे यांच्याशी संपर्क साधला रुग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन डॉ. सचिन कसबे यांनी आसीयु बेड पलब्ध करून देतो असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली नातेवाईक हतबल असल्याने एक लाख रुपये देण्यासही तयार झाले दरम्यान डॉक्टर सचिन कसबे यांनी पद्मजा हॉस्पिटल वालेकरवाडी चिंचवड मधील त्यांचे सहकारी कलिग डॉक्टर शशांक भरत राळे यांच्यामार्फत डॉक्टर प्रविण जाधव कन्सल्टंट स्पर्श प्रा. लि.यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या ऑटो क्लस्टर कोवीड सेंटर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कोणती प्रोसिजर फॉलो न करता बेड उपलब्ध झाला असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांकडून ऑटॉक्लस्टर येथे रुग्णास हलवल्या बाबत सांगण्यात आले दरम्यान डॉ. सचिन कसबे यांनी त्यांच्या मध्यस्थी राहुल काळे या यांच्याद्वारे रुग्णांच्या नातेवाइकांकडून 23 एप्रिल 2021रोजी दुपारी पद्मजा हॉस्पिटल समोर एक लाख रुपये घेतले व वरील दोन्ही डॉक्टरांनी स्वीकारले व ठरल्याप्रमाणे रुग्णाला दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी ऑटो क्लस्टर कोविड सेंटर चिंचवड येथे दाखल केले नियोजनाप्रमाणे डॉ. प्रविण जाधव स्पर्श प्रा.लि. तर्फे ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड हे स्वतः 23 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी पद्मजा हॉस्पिटल समोर येऊन एक लाख मधील
80 हजार रुपये राळे डॉक्टर मार्फत डॉक्टर प्रविण जाधव यांनी स्वीकारले उर्वरित रक्कम वीस हजार रुपये कमिशन म्हणून डॉक्टर शशांक राळे,डॉक्टर सचिन कसबे यांनी ठेवून घेतले सदर गोष्ट उघड झाल्याने पिंपरी पोलीस ठाणे येथे भा.द.वि कलम 384,406,420 प्रमाणे 1)आरोपी डॉक्टर प्रवीण शांतवन जाधव स्पर्श प्रायव्हेट लिमिटेड 2)आरोपी शशांक भरत राळे पद्मजा हॉस्पिटल वालेकर वाडी चिंचवड पुणे व 3)आरोपी सचिन डॉक्टर सचिन श्रीरंग कसबे पद्मजा हॉस्पिटल वालेकर वाडी चिंचवड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर प्रविण जाधव स्पर्श प्रायव्हेट लिमिटेड यांना तात्काळ अटक करण्यात आली मात्र आरोपी डाॅ. शशांक राळे व डॉ.सचिन कसबे हे दोघेही फरार होण्याच्या तयारीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे सहाय्यक पोलीस फौजदार काकडे पिंपरी पोलीस ठाणे यांनी गोपनीय माहिती काढून शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व अटक केली. आरोपींना 06 मे 2021 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तपासादरम्यान नातेवाईक यांच्या जबाबानुसार रुग्ण यांना अटक लास्ट ॲडमिट करत असताना रुग्णाच्या हातामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या परंतु रुग्णांमध्ये झाल्यानंतर त्या मिळून आले नाहीत त्याबाबतही तपास पुढे चालू आहे,आरोपी डाॅक्टर या समवेत आणखी कोणकोण आहे नगरसेवक,डाॅक्टर आजुन कोणी स्टाफ कार्यकर्ते हे जसजस तपासात आढळतील तशीतशी माहिती समोर आणली जाईल,गाफील राहुन जमणार नाही,पॅन्डामीक परस्थित कोणतीही राजकारण होऊ देणार नाही.सर्व बाजुने तपास केला जाईल त्यासंबंधित पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन ही संपूर्ण माहिती दिली व तपासामध्ये उघड होईल त्याप्रमाणे आणखी गुन्हे दाखल करण्यात येईल तरी या सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड रामनाथ पोकळे , तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पिंपरी चिंचवड मंचक इप्पर,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सागर कवडे,पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे सचिन सूर्यवंशी सहाय्यक फौजदार राजेंद्र काकडे व पोलीस हवालदार दत्तात्रय निकम शांताराम हांडे सपकाळे पोलीस नाईक शहाजी धायगुडे ओझरकर यांनी मिळून सदरची कारवाई केली आहे पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत