देहुरोड,दि.03 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर मोका व एम पी कायद्यांतर्गत परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड यांनी दिले असून त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता सारखे जीवघेणे हत्यार, चोरी,दरोडा घालने,आत्याचाराचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, दुखापत करणे दरोडा घालून सार्वजनिक शांतता सुव्यवस्थेस बाधा पोहोचवणे,बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे यासारखे गुन्हे करणारा कुप्रसिद्ध गुन्हेगार राहुल संजय टाक (वय 20 वर्ष )राहणार एम बी कॅम्प किवळे देहू रोड पुणे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री कृष्ण प्रकाश साहेब यांनी एम पी डी ऐ कायद्या खाली स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्याने त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे दिनांक 1 मे 2021 रोजी सदर कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले असुन कुप्रसिद्ध गुन्हेगार संजय राहुल टाक वय याने देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2019 पासून आत्तापर्यंत 6 गंभीर गुन्हे केले आहेत त्याच्या गुन्ह्याचा चढता आलेख पाहून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानुसार देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप, पोलीस शिपाई यादव यांच्या पथकाने त्यांच्यावर एम पी डी ऐ कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव संजय नाईक पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग, आनंद भोईटे पोलिस उपायुक्त परिमंडळ-2, रामनाथ पोकळे-अप्पर पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्फत पोलीस आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्ताव त्रुटी विरहित तसेच परिपूर्ण रित्या सादर करण्याची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त- रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमट पोलीस उपायुक्त गुन्हे,प्रशांत अमृतकर – सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.संजय तुंगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसीबी गुन्हे शाखा (अति कार्यभार) पोलीस हवालदार सचिन चव्हाण पीसीबी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी केली.