पिंपरी,दि.13 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-11 एप्रिल ते 14 एप्रिल पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका द्वारा आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विचार प्रबोधन पर्व 2021चे दरवर्षी प्रमाणे आयोजन करण्यात आले माञ या वर्षी कोरोना मुळे आॅनलाईन जंयतीचे पर्व घेतले आहे.कृष्ण प्रकाश पोलिस आयुक्त यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विवेचनात्मक विषयावर लक्ष वेधले,धार्मीक अर्थव्यवस्था, सदाचाराचा मार्ग हा बुद्ध धम्म कसा आहे यावर बोलत होते.भारताचे राज्यघटना एकच आहे ती लोक कल्याणासाठी आहे,ती आत्मसाथ करावी,विचारांचे आधान प्रधान करावे,व शासनाने दिलेले नियम पाळावे व जंयतीच्या आपणास सर्वाना हार्दीक शुभेच्छा दिल्या या वेळी समाज विकास आधिकारी संभाजी ऐवले,जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड,चिंचवडचे वरीष्ट पोलिस निरिक्षक सुधाकर काटे,आर.पी.आय अजिज भाई शेख वाहतुक आघाडी महाराष्र्ट प्रदेश अध्यक्ष,आर.पी.आय शहरध्यक्ष सुरेश निकाळजे,एम.आय.एम शहराध्यक्ष धम्मराज साळवे,पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाचे अध्यक्ष कलिंदर शेख उपस्थित होते.