पिंपरी, दि.११ एप्रिल २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस तसेच महात्मा फुले यांच्यापुर्णाकृती पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई (नानी) घुले , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,विरोधी पक्ष नेते राजु मिसाळ, आयुक्त राजेश पाटील,नगरसेवक संतोष लोंढे उपायुक्त आशादेवी दुरगुडे,अति.आयुक्त उल्हास जगताप,कामगार नेते गणेश भोसले,सामाजीक कार्यकर्ते धम्मराज साळवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किरण गायकवाड यांनी केले.