पिपंरी,दि.10 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात शासनाच्या नियमांनुसार लसीकरण सुरु आहे. शहरातील लोकसंख्या आणि बाधित होणा-या रुग्णांचे प्रमाण पाहता लसीकरण केंद्राची संख्या अपुरी आहे. रोजच वाढत जाणारी रुग्णांची संख्या विचारात घेता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत मागणी प्रशासनाकडे केली आहे. याची देखिल पुर्तता ताबडतोब करावी. तसेच वैद्यकीय विभागातील मनुष्यबळ कमी पडत आहे. आवश्यक तेथे शिक्षण मंडळ, पीएमपीचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात वर्ग करुन घ्यावेत. मागील वर्षी असे अतिरिक्त कर्मचारी घेण्यात आले होते. तसेच ज्याप्रमाणे पोलिओ लसीकरण साठी खासगी रुग्णालयातील कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक घेतले जातात तसे अतिरिक्त मनुष्यबळ मदतीला घ्यावे.तसेच भोसरीत वाढणारे रुग्णांचे प्रमाण आणि दाट लोकवस्तीचा भाग विचारात घेऊन भोसरी गावठाणामधील छत्रपती शिवाजी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, दिघी रोड सॅण्डविक कॉलनी येथिल विरंगुळा केंद्र आणि प्राधिकरण मोशी सेक्टर चार मधिल केंद्रिय विहार येथिल हॉल मध्ये लसीकरण केंद्र तातडीने सुरु करावे अशीही मागणी ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.