पिंपरी,दि.08 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर वतीने आज आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे आज गुरुवार दुपारी 4:00 वाजता करण्यात आले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने करोना साथीच्या बिकट काळात, महानगरपालिकेच्या महत्वाच्या रेमडीसिव्हर औषधांच्या खरेदीस नकार देण्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात आणि शहर राष्ट्रवादी वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाने पालिकेच्या गेटवर आ आंदोलन झाले.आयुक्तांनी पञकारांना प्रतिक्रिया दिली.कोविड काळात नियमांचे उल्लघंन करत आंदोलन करणार्यावर कारवाही केली जाईल.पालिकेतील सि सि टि व्हि फुटेज पाहुन संबधीत राष्र्टवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाही करणार असल्याचे म्हटले.