मुंबई, 05 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,त्यामुळे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल पञकार परिषद घेत घोषणा केली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले असुन. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरलं हे नेमकाअजुन स्पष्ट झाले नाही. अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.त्यासाठी मुख्यमंञ्याकडे ते रवाना झाले आहेत.अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,अतुल भातखळकर,नितेश राणे आणि किरट सोमय्या यांनी राजीनाम्याच्या मागणीचा जोर धरला होता.त्यानी न्यायलयाचा निर्णयाचे स्वाग केले.