Home ताज्या बातम्या नांदेड जिल्ह्यात 12 ते 21 मार्च पर्यंत अंशतः लॉकडाउन जाहीर

नांदेड जिल्ह्यात 12 ते 21 मार्च पर्यंत अंशतः लॉकडाउन जाहीर

0

नांदेड,दि.11 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यात 12 ते 21 मार्च पर्यंत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यादरम्यान ट्युशन, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद. मेडीकल वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सातपर्यंतच सूरू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.नांदेड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात 12 ते 21मार्चपर्यंत अंशतः लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.यामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, खाद्यगृह, परमिटरूम, धार्मिक, राजकीय, मंगल कार्यालय, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद. मेडीकल वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात पर्यंतच सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश.त्याचप्रमाणे जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी तहसीलदारांची परवानगी बंधनकारक करण्यात आलीय. जिल्ह्यात 16 मार्च ते 21 मार्चपर्यंत मंगल कार्यालय, सभागृह, लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, खेळाची मैदाने सुरू राहतील मात्र कोणत्याही स्पर्धा घेण्यासाठी बंदी राहील. तसेच यापूर्वी घोषित केलेल्या सर्व परीक्षा कोरोना नियमावलीचे पालन करून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायजरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सदरील आदेश 12 मार्च मध्यरात्री पासून 21 मार्च मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केलं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 16 =

error: Content is protected !!
Exit mobile version