Home ताज्या बातम्या नगरसेवक रवि लांडगेचा स्थायी समीती सदस्य पदाचा राजीनामा स्थानिक आमदारांनी शब्द पाळला...

नगरसेवक रवि लांडगेचा स्थायी समीती सदस्य पदाचा राजीनामा स्थानिक आमदारांनी शब्द पाळला नसल्याचा अरोप

0

पिंपरी,दि.02 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप पक्षाने व स्थानिक आमदारांनी डावलल्याने नाराज झालेले नगरसेवक रवी लांडगे यांनी नाराजी व्यक्त करत तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील भाजपा अंतर्गत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन पालिकेत व शहरात रवी लांडगे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का असा प्रश्न जनतेतुन उपस्थित केला जात आहे, भाजपाचे सध्याचे स्थानिक वरीष्ठ नेते रवि लांडगेची नाराजी दूर करतील का हे आव्हान शहरातील पक्षप्रमुख म्हणून भाजपच्या नेत्यांपुढे उभे राहीले आहे. रवी लांडगे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

स्थायी समीती अध्यक्ष पद न दिल्याने स्थायी समिती सदस्य पदाचा रवी लांडगे यांनी राजीनामा दिल्यानतंर पञकारांशी संवाद साधला व स्थानिक आमदारांनी शब्द दिला होता तो पाळा नाही,वरीष्ठ नेत्यांनी ही न्याय दिला नाही.म्हणुन महापोर यांच्या कडे आज राजीनामा दिला निष्ठावंत कार्यकर्त्याची दख्खल आताचा भाजपातील नेते घेते नाही माञ पक्षाचा विचारांवर व पक्षावर माझी निष्ठा आहे प्रेम आहे असे रवि लांडगे पञकारांशी बोलल होते.माञ का डावले हे अद्याप कळले नाही.कारण शोधुन पुढील दिशा ठरवणार आता पिंपरी चिंचवड मध्ये जुन्या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्ते डावलण्याचा ट्रेंड चालु आहे.असे बोलुन रवि लांडगे यांनी स्वताला डावले असा अरोप केला.भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. या नंतर रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version