Home ताज्या बातम्या हुतात्मा भाई कोतवाल यांनी द-या, खो-यात स्वातंत्र्य लढा उभारला – संजय माने

हुतात्मा भाई कोतवाल यांनी द-या, खो-यात स्वातंत्र्य लढा उभारला – संजय माने

0

पिंपरी,दि. 2 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माथेरान या पर्यटनस्थळी येणारे पर्यटक स्थानिकांना मेहनतीचा योग्य मोबदला देत नाहीत. या विरुध्द स्थानिक कष्टकरी कामगारांची संघटना प्रथम विठ्ठल कोतवाल यांनी उभारली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी माथेरान येथिल कष्टकरी, स्थानिक भुमीपूत्रांना आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून दिला. यावेळी तत्कालीन इंग्रज अधिका-यांविरुध्दच्या यशस्वी लढ्यात विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांच्या संघटनेचा विजय झाला. तेंव्हापासून विठ्ठल कोतवाल यांना येथिल नागरीक सन्मानाने ‘भाई’ नावाने संबोधू लागले. अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पिंपरी चिंचवड माजी शहराध्यक्ष संजय माने यांनी दिली.मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) हुतात्मा भाई कोतवाल यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने फुगेवाडी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेविका संध्या गायकवाड, संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळूंजकर, माजी अध्यक्ष अशोक मगर, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा अनिता मगर, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा कविता यादव, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदिप वाळुंजकर, भिष्मा गायकवाड, सुरेश मोरे, प्रकाश तीरलापुरकर, भाऊसाहेब यादव, सागर आढाव, गणेश शिंदे, संतोष शिंदे, अशोक पंडीत, सचिन सूर्यवंशी, सुरेश मोरे, हरिभाऊ शेळके, नागेश भोपुलकर, मदन तांदळे, संदिप पंडित, नितीन कुटे, सचिन राऊत, समाधान गवळी, नितीन सुरवसे, हेमंत श्रीखंडे, किशोर पवार, नागेश कोकाटे, इमरान शेख, अविनाश महाले, संदिप दळवी, राम जाधव, महादेव काशीद, मारुती काटके, अभय श्रीमंगले आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक मगर म्हणाले, स्वातंत्र्यपुर्व काळात मुंबईत गिरणी कामगारांची पहिली कामगार संघटना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली. भाई कोतवाल यांनी मुंबईत वकिलीचे शिक्षण घेत असताना या विषयावर चिकित्सक पध्दतीने अभ्यास केला. रावबहादूर लोखंडे यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करताना आपणही रायगड, ठाणे येथिल डोंगर, द-यातील आदिवासी, कातकरी, ठाकर, शेतमजूर कष्टकरी अशा नागरिकांसाठी संघटना उभारुन लढा उभारु आणि त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ अशी खूणगाठ मनाशी बांधली. आपले वकिलीचे शिक्षण पुर्ण करुन ते जेंव्हा आपल्या मूळ गावी माथेरान येथे आले. तेंव्हा त्यांनी प्रथम संघटना उभारली. यातूनच पुढे त्यांनी द-या, खो-यातील उपेक्षित नागरिकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयी स्फुल्लींग जागविले. घरची परिस्थिती हलाखीची असताना वकिली पर्यंत शिक्षण घेऊन भाई कोतवाल हे पुण्या – मुंबईत वकिली करु शकले असते. परंतू त्यांनी पैशापेक्षा देशसेवेला जास्त महत्व दिले. उपेक्षित नाभिक समाजातील या लढवय्या वीर हुतात्माचा इतिहास नविन पिढी पुढे आला पाहिजे यासाठी भाई कोतवाल यांचे जीवनचरित्र राज्य सरकारने भरघोस निधी देऊन प्रकाशित करावे, अशीही मागणी अशोक मगर यांनी केली.संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पुणे – मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे ‘भाई हुतात्मा कोतवाल’ यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. यासाठी दहा लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. हे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित काम महानगरपालिकेने लवकरात लवकर सुरु करावे. स्वागत गणेश शिंदे, सुत्रसंचालन संदिप पंडीत आणि आभार सागर आढाव यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version