Home ताज्या बातम्या पुणे जिल्ह्यात सलग 4 दिवस ‘ड्राय डे’ 3 डिसेंबर पर्यंत

पुणे जिल्ह्यात सलग 4 दिवस ‘ड्राय डे’ 3 डिसेंबर पर्यंत

0

पुणे,दि.29 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुणे जिल्ह्यात सलग 4 दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे कारण, पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे 4 दिवस मद्यविक्री, परमिट रुम आणि बार बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेत.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागु करण्यात आलेत . मदतानाच्या 48 तास अगोदर मद्यविक्री आणि बार बंद ठेवणार आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला मद्यविक्री बंद असल्याने ड्राय डे असणार आहे.
दरम्यान, 29 नोव्हेंबरला सांयकाळी 5 नंतर मद्यविक्री करणारे शॉप आणि बार बंद करण्यात येणार आहे.
30 नोव्हेंबर हा मतदानाच्या अगोदरचा दिवस असल्याने मदयविक्री बंद राहणार आहे. 1 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान राहणार आहे. मतदान संपल्यानंतर शॉप्स आणि बार उघडले जाणार आहेत. 2 डिसेंबरला निवडणूकीविषयी कोणतेही कामकाज नाही. त्यामुळे दिवसभर मद्यविक्री करणारे बार आणि शॉप सुरु राहणार आहेत. दरम्यान, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे मतमोजणी असलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मद्य विक्री बंद राहणार आहे.

याबाबत, निवडूक आयोगाच्या सुचना आणि जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार चार दिवस दिलेल्या वेळांमध्ये मद्यविक्रीची शॉप आणि बार बंद राहतील, संबधित विभागाच्या निरीक्षकांना आदेशाचे पालन व्हावे यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती, राज्या उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 13 =

error: Content is protected !!
Exit mobile version