Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड- “स्मार्ट सिटी” तील स्मार्ट भ्रष्टाचारात भाजपाचे विरोधी पक्षनेत्या सह सत्ताधारी...

पिंपरी चिंचवड- “स्मार्ट सिटी” तील स्मार्ट भ्रष्टाचारात भाजपाचे विरोधी पक्षनेत्या सह सत्ताधारी दोन्हि आमदार व पालिका आयुक्त – शिवसैनिक योगेश बाबर(शहरप्रमुख)

0

चिंचवड,दि.२५नोव्हेंबर २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- “स्मार्ट सिटी” तील सत्ताधारी भा.ज.पा. चा स्मार्ट भ्रष्टाचार “, ५२० कोटींच्या टेंडर मध्ये तब्बल ३०० कोटींचा भ्रष्टाचार – सत्ताधारी भ.ज.पा आमदार, स्मार्ट सिटी संचालक त्यांची पाठराखण करणारे भाजप धार्जिणे आयुक्त आणि प्रशासन सहभागी असल्याचा थेट आरोप पञकार परिषदेत शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.शिवसेनेची पञकार परिषद काल दि.२४ नोव्हेंबर २०२०रोजी सायं चिचवड हाॅटेल सेलिब्रेशन येथे पार पडली.

PCSCL (पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ली.) टेंडर क्र.८ दि०९/१०/२०१९, ( Selection of SYSTEM INTEGRATOR for Supply, Installation, Testing, Commissioning and O&M for ICT led PCSCL Smart City Solutions) या ५२० कोटी रु. चे टेंडर, SYSTEM INTEGRATOR म्हणून Tech Mahindra Co. Ltd. , Krystal Integrated Services Pvt. Ltd., Arceus Infotech Pvt. Ltd या Consortium ची Lead Bidders म्हणून निवड करण्यात आली. १५ मे २०१९ रोजी या Consortium बरोबर PCSCL (पिं. चिं. स्मार्ट सिटी लि.) ने SYSTEM INTEGRATOR म्हणून ५२० कोटीचे कामांचे Master Service Agreement ( यापुढे MSA म्हणून उल्लेख ) केले आहे.या SYSTEM INTEGRATOR द्वारे करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून PCSCL ची किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची फसवणूक या टेंडर द्वारे होणार आहे. या टेंडर मध्ये SYSTEM INTEGRATOR सोबत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार, स्मार्ट सिटी संचालक त्यांची पाठराखण करणारे भाजप धार्जिणे महापालिका आयुक्त आणि प्रशासन सहभागी आहेत.

PCSCL कडून MSA मध्ये ज्या कामाचे ९.७० कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे , ते काम SYSTEM INTEGRATOR आणि त्याचा Sub Contractor अधिकृत पुरवठादार Adept Fluidyne Pvt. Ltd. यांना २ कोटी ५३ लाख ( टॅक्स सहित ) रुपयात करण्यास भाग पाडत होते. या एकाच कामामध्ये ७.२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
१. Krystal Integrated Services Pvt. Ltd., तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनी चा Smart City Solutions शी संबंध काय ? त्यांच्या सह्भागामध्ये कुणाचा हात ? त्यांचा सहभाग कोणते SMART काम करण्यासाठी ?

२. Field Infrastructure : Advance Water Metering Application या कामासाठी SYSTEM INTEGRATOR द्वारे MSA मध्ये अधिकृत पुरवठादार म्हणून Adept Fluidyne Pvt. Ltd. या कंपनी चा समावेश केल्यानंतर, ठरलेल्या किमतीत आणि वेळेत काम करण्याची तयारी असताना त्यांचे काम का काढून घेण्यात आले ?
३. LIVE FIBRE PVT. LTD. या कंपनीला बेकायदेशीर रित्या काम Sub Contract कसे करण्यात आले ? PCSCL ची परवानगी घेण्यात आली आहे का ?
4. पिं. चिं. महापालिकेचे आयुक्त आणि स्मार्ट सिटी चे सी.ई.ओ श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्ष ते खाली १० सप्टेंबर’२०२० रोजी झालेल्या बैठकीत Adept Fluidyne Pvt. Ltd. यांना पुरवठादार म्हणून हटविण्यात आले. पिं. चिं. महापालिकेचे आयुक्त आणि स्मार्ट सिटी चे सी.ई.ओ श्रावण हर्डीकर आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने खुलासा करावा –
• System Integrator शी ठरलेल्या किमतीत आणि मानकांप्रमाणे पुरवठा करण्याची तयारी असताना Adept Fluidyne Pvt. Ltd. ने Work Order का नाकारली ? त्यांचे म्हणणे का ऐकून घेण्यात आले नाही ?
• LIVE FIBRE PVT. LTD. या कंपनीचा प्रतिनिधी या बैठकीस कोणत्या अधिकाराने उपस्थित होता ?
• System Integrator ला आर्थिक फायदा व्हावा या साठी Adept Fluidyne Pvt. Ltd. यांना बदलण्यात आले का ?

“ या आर्थिक फायद्याचे कोण कोण वाटेकरी आहेत ते आयुक्तांनी जाहीर करावे “
असा अनेक प्रश्नाचा भडिमार पञकार परिषदेत करण्यात आला आहे,या आयुक्त आणि आमदार तसेच स्मार्ट सिटी संचालक उत्तर काय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.त्यावर काल पासुन पालिकेत आणि शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

मा. ना. एकनाथजी शिंदे (नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांचे कडे या संदर्भात निवेदन देण्यात आले असून, PCSCL (पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ली.) टेंडर क्र.८ दि०९/१०/२०१९, हे ५२० कोटी रु. चे टेंडर त्वरित स्थगित करून, टेंडर मधील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाई करणेची मागणी शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली त्यावर मा. मंत्री शिंदे यांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.या भ्रष्टाचारात दोन्हि आमदार आजी माझी पिंपरी चिंचवडचे शहरध्यक्ष भाजपचे आयुक्त श्रावण हार्डिकर व त्यांचे पदाधिकारी आहेत असा थेट अरोप योगेश बाबर यांनी पञकार परिषदेत केला.व जनतेच्या कर रुपी पैशाचा अपव्यय होऊ देणार नाही.आणखी भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे असे बाबर म्हणाले.या पञकार परिषदेत माजी आमदार अॅड.गौतम चाबुकस्वार,अनिता मच्छिंद्र तुतारे(चिंचवड विधानसभा संघटिका),ज्ञानेश्र्वर शिंदे(शिवसेना पि.चि.शहर सचिव),मच्छिंद्र देशमुख(विभाग प्रमुख),विवेक तितरमारे(विभाग समन्वयक),अधिकराव भोसले,गोपाळ मोरे,बाळासाहेब वाल्हेकर आदी.पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पहा व्हिडीओ काय बोले शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर

“स्मार्ट सिटी” तील स्मार्ट भ्रष्टाचारात BJP विरोधी पक्षनेते दोन्हि आमदार व पालिका आयुक्त- योगेश बाबर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − one =

error: Content is protected !!
Exit mobile version