चाकण-खराबवाडी,दि.23 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-युनीथर्म इंजिनिअरिंग प्रा.लि.खराबवाडी
जि.पुणे या कंपनीत काम करणारे मयत कै. मुरलीधर बाबाजी नलावडे यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य कामगार अधिनियम नुसार संबंधित नलावडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी रिपाइंच्या वतीने युनिथर्म इंजिनिअरिंग प्रा.लि. कंपनीच्या गेटवर निदर्शने आंदोलन करण्यात आले मयत कामगार कै.मुरलीधर बाबाजी नलावडे हे कंपनीतून घरी जात असताना त्यांचे अपघाती निधन झाले दोन वर्षे उलटूनही आजपर्यंत कंपनीने सदर कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून कुटुंबाला मदत केली नाही ही बाब गंभीर असून महाराष्ट्र राज्य कामगार अधिनियम महाराष्ट्र राज्य कामगार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.असे मत अंदोलन कर्त्यानी अंदोलनपर बोलताना व्यक्त केले.मयत मुरलीधर नलावडे हे 2007 पासुन कंपनीत कायम स्वरुपी तत्वावर काम करत होते. त्यांच्या वर संपुर्ण कुटुंबांची जबाब दारी होती संपुर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबुन होते. आज नलावडे कुटुबांची दयनियअवस्था आहे.कामगार कायद्याला अधीन राहून सदर कुटुंबाला योग्य ती मदत दिली जावी कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी कामाला घेण्यात यावे या मागणीवर रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आले.कंपनी कडुन टाळाटाळ होत असुन कंपनी प्रशासन उदासिन भुमिका घेत आहे.कामगारामुळे कंपनी चालते मग तोच कामगार अपघाती मृत पावल्यास त्याच्या कुंटुबाला मदत करणे अपेक्षित असते.पण यूनिथर्म कंपनी या बाबत टाळाटाळ करत आहे.तसेच कामगार आयुक्तालय या ठिकाणी बैठकीस जाण्यास व टाळाटाळ करत आहे.आज अंदोलन कर्त्याशीं कंपनीचे मॅनेजर एच आर केदार लिमऐ यांनी गेट वर येऊन भेट घेतली व मयत नलावडे कुटुबांच्या दुःखात कंपनी प्रशासन सामील आहे.कंपनीच्या नियमानुसार व कामगार कायद्यानुसार कंपनी प्रशासन निर्णय घेईल तसेच कामगार आयुक्ताच्या बैठकीत जो निर्णय होईल त्या पद्धतीने मदत करेल असे अंदोलन कर्त्यानां संबोधले.तसेच कामगार आयुक्तांच्या बैठकीस कंपनी प्रशासनाकडुन प्रतिनिधी उपस्थित राहतील या अश्वासनाचे लेखी पञ दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.माञ समाधान कारक उत्तर मिळाले नाही.कंपनी प्रशासन टाळाटाळ करत असल्याची चर्चा माञ रंगली. न्याय न मिळाल्यास तिव्र अंदोलन करण्याचा इशाराही रिपाई कडुन देण्यात आला.बाबा कांबळे यांनी कामगारांच्या कायद्या विषयी माहिती देत नलावडे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली.नेते मंडळीने भाषण निषेध व रोष व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र कामगार कष्टकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे,सामाजीक कार्यकर्त्या अनिताताई साळवे,रिपाई वाहतुक आघाडीचे अजीज भाई शेख,रिपाईचे हरिष देखणे,कपिल सरोदे,विष्णू भोसले, कैलास केदारी,अॅड अरुण सोनवणे,अजय लोंढे, नाना डोळस पदाधिकारी कार्यकर्ते व नलावडे परिवार उपस्थित होते.