Home ताज्या बातम्या EVM बंदीसाठी जणआंदोलन उभारणार – पँथर डॉ राजन माकणीकर

EVM बंदीसाठी जणआंदोलन उभारणार – पँथर डॉ राजन माकणीकर

0

मुंबई,दि.16 नोव्हेंबर 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संपूर्ण देशात EVM हा विषय फार मोठा असून EVM द्वारे निवडणूक होणे लोकशाहीला घातक असल्यामुळे लवकरच या विषयावर जनआंदोलन उभारू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे केंद्रीय महासचिव व सल्लागार पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.

पँथर डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, जर्मनी सारख्या देशात एक सर्वसाधारण व्यक्ती EVM विरोधात न्यायालयात जातो तेंव्हा EVM कायमस्वरूपी बंद केले जाते मात्र आपल्या देशात विरोधी पक्ष व विविध सामाजिक संस्था व संघटना एकत्र येऊनही बंद नाही करू शकत.

आज सर्व विकसित राष्ट्र सुद्धा EVM चा वापर न करता बैलेट पेपर द्वारे मतदान करत आहेत मात्र आपल्या देशात EVM ने मतदान का घेतले जात आहे(?).EVM द्वारे घेतलेली निवडनुकीचे निकाल संशयास्पद असून देखील EVM बॅन का होत नाही याबद्दल शाशंकता निर्माण होत आहे.EVM बंदी व समविधान जनजागृतीसाठी आता लोकांनी रस्त्यावर येणे आवश्यक आहे.

EVM बंदीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्मांची धर्मगुरू एकत्र करून सामोपचाराने लवकरच जनजागृती च्या माध्यमातून उग्र आंदोलन उभारनार आहेत.

पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला आलेली पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेच्या या रिपाई डेमोक्रॅटिक या राजकीय पक्षाच्या माध्यमातून लवकरच EVM बंदीसाठी आक्रमकता दाखवून येणारी महानगरपालिका निवडणूक बैलेट पेपरणेच करवून आणण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडू असा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच पँथर श्रावण गायकवाड, वंचित नेते वीरेंद्र लगाडे, सम्यक पँथर चे सचिन भूटकर, ऍड. नितीन माने, गौतम सोमवंशी, मराठवाडा प्रमुख वसंत लांमतुरे, रिपाई डेमोक्रॅटिक अल्पसंख्यांक सेल मुंबई अध्यक्ष मुंनवर अली, साऊथ सेल मुंबई युवाध्यक्ष राजेश पिल्ले, आदी व अन्य महाराष्ट्र भर मोटारसायकल EVM बॅन अभियान राबविणार असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version