देहुरोड,दि.03नोव्हेंबर2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड वरती बेधडक मोर्चा बुद्धविहार ट्रस्ट देहुरोड यांच्या नेतृत्वात करण्यात आला. सदर मोर्चा ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड या ठिकाणी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बुद्धविहार कृती समिती व त्यांचे प्रमुख ट्रॅक्सास गायकवाड व त्यांचे साथीदार यांच्यावर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी दाखल करावी व बेकायदेशीर कामांना सपोर्ट करणारे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावे यासंबंधी बुद्धविहार ट्रस्ट देहूरोड यांनी आजचा मोर्चा चे आयोजन केले होते बुद्ध विहार देहूरोड येथे बुद्ध विहार ट्रस्ट देहूरोड ही चॅरिटी पुणे या ठिकाणी रजिस्टर नंबर:ए/1197/ पुणे नोंद असून अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत बुद्ध विहार व अस्ती स्तूप याची स्थावर मिळकत 1966 पासून ट्रस्ट कडे असल्याने तेथे 1966 पासून बुद्ध विहार ट्रस्ट देहुरोड कार्यरत आहे.
बुद्ध विहार कृती समिती व त्यांचे सहकारी,त्यांच्या संलग्न असणाऱ्या संघटना यावर कारवाई झालीच पाहिजे या मागणीकरिता बुद्ध विहार ट्रस्ट सोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व आरपीआय (आठवले गट) रिपब्लिकन सेना, ऑल इंडिया पॅंथर सेना, बहुजन समाज पार्टी व सर्व समाजातील त्यांचे प्रतिनिधी या मोर्चात सामील झाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांचे सुप्रिडेन्ट आॅफिसर सावंत यांनी शिष्टमंडळाला बोलून त्यांच्याशी चर्चा केली अधिकारी नसल्याने त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून अधिकारी असताना 04 नोव्हेंबरला शिष्टमंडळाला भेटण्यास सांगितले व तसेच कारवाई करत असल्याबाबत बुद्ध विहार ट्रस्ट व त्यांच्या शिष्टमंडळाला पत्र दिले मीटिंगमध्ये बांधकाम इंजिनिअर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संबंधित शिष्टमंडळ व त्यांचे पदाधिकारी हे संतापले होते पण अधिकारी सावंत यांनी चर्चा केल्यामुळे वातावरण थोडे निवळले.
पोलीस स्टेशन, स्टेशन हेडकॉटर देहूरोड यांना पत्र देऊन योग्य ते कारवाई करून सदर ठिकाणी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करत त्यांना तिथे थांबवु विनापरवाना अनधिकृत बांधकामाबद्दल संबंधित कॅन्टोन्मेंट कायदा 2006 च्या कलम 239 (1) नुसार प्रशासनाने नोटीस दिली आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासन योग्य ती कारवाई करेल असे हमीपत्र सावंत यांच्या सहीने दिले
या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड देवेंद्र तायडे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिलीप कडलक ,मावळ वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड, राहुल गायकवाड, वंचित चे वसंत साळवे,संतोष जोगदंड,आॅल इंडिया पॅंथर सेनेचे शरद गायकवाड, अजय गायकवाड, बाळासाहेब शेंडगे, जितेश जगताप, संतोष शेंडगे, किशोर काशीकर,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढसाळ,प्रवक्ते हौसाराव शिंदे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे,महिला शहराध्यक्ष भीमा ताई तुळवे, बुद्ध विहार ट्रस्टचे गुलाब चोपडे,अॅड. अशोक रूपवते,सुनील कडलक,संजय आगळे,रोहन गायकवाड, चंद्रकांत भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव राधाकांत कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, देहुरोड विभाग अध्यक्ष संजय आगळे,रंजनीकांत क्षिरसागर,राजश्रीताई जाधव,सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम,प्रज्ञा संजय आगळे,संगीता गायकवाड, संजिवीनी चव्हाण,सहदेव भालेराव,वामन केदारी,अप्पू शिवशरण,प्रकाश कांबळे, के.डी वाघमारे,पी एस गायकवाड,प्रकाश ओव्हाळ,पुष्पा सोनवणे,प्रतिभा थोरात,रेखाताई डावरे,कौशल्याताई शेलार,रेणुका गायकवाड,सरला उपरवटा,अरूणा मेहरावे,प्रतिभा थोरात,गौरी शेलार,पल्लवी वाघ,उषा वाघ,नाना गायकवाड,भिमराव ढोबळे,रंघनाथ साळवे,मछिंद्र कदम,दत्ता गायकवाड,विठ्ठल ओव्हाळ,गौतम ओव्हाळ,दलितानंद थोरात,भीमशाहीर प्रकाश गायकवाड,मधुकर रोकडे,गौतम सोनवणे,बाळु बरगले आदी. संघटनांचे पदाधिकारी व सर्व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.