Home ताज्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा

0

पुणे,दि.25 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञानावरील ज्ञानाच्या, अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याच्या, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधन नियमांचं पालन करुन साजरा करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. ‘दसरा सण मोठा… नाही आनंदाला तोटा…’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यासाठी जुने वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन प्रेमाचं, स्नेहाचं, चांगल्या विचारांचं आदानप्रदान करण्याचा हा सण आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं वाईट विचारांना तिलांजली देऊया… असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दसऱ्याच्या निमित्तानं सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी. राज्यातून, देशातून, जगातून कोरोना संकटाचं उच्चाटन व्हावं, अशा शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + eighteen =

error: Content is protected !!
Exit mobile version