देहुरोड,दि.07 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित बळीत दलित युवतीच्या बुलगडी या गावातील घरी जाऊन तिच्या शोकाकुल परिवाराची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या परिवाराला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्षातर्फे सांत्वनपर 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे सांगून पीडित बळीत दलित युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा लढाईत रिपब्लिकन पक्ष या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले आहे.
उत्तर प्रदेश के हाथरस जनपद में पीड़िता के परजिनों से व्यक्तिगत भेंट कर सान्त्वना प्रदान की । पीड़िता के परिजनों को न्याय दिलाने के लिए मैं और आरपीआई के देश भर के कार्यकर्ता हरसंभव प्रयास करेंगे । pic.twitter.com/Ss6yhgv3vb
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 6, 2020
हाथरस ची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर हाथरस च्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला.आंदोलन केले.लखनौला जाऊन उत्तर प्रदेश च्या राज्यपालांची आठवलेनी भेट घेतली. हाथरस ला भेट देण्यास जाताना तेथिल जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे दि. 2 ऑक्टोबर ला हाथरस जाऊ शकलो नाही म्हणुन आता आज हाथरस ला जाऊन पीडित बळीत दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा ना रामदास आठवले यांनी केला.