Home ताज्या बातम्या स्केल्स अॅण्ड टेल्स टिम ने वनअधिकारीच्या उपस्थित दिले अनेक सर्पाना जीवदान

स्केल्स अॅण्ड टेल्स टिम ने वनअधिकारीच्या उपस्थित दिले अनेक सर्पाना जीवदान

0

देहुरोड,दि.29 सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- घोरावडेश्वर वनक्षेत्र विभाग-मावळ पुणे या ठिकाणी स्केल्स अॅण्ड टेल्स टिम ने वनअधिकारीच्या उपस्थित दिले अनेक सर्पाना जीवदान दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी वनविभाग मावळ पुणे च्या वनाधिकारी रेखा वाघमारे आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणारे सदस्य आशिष चांदेकर रितेश साठे विशाल बोडके निखिल कुंभार टिपु सुलतान ऋषिकेश शिरसाठ सिद्धेश मोहिते आदित्य मोहिते स्वप्निल कुंभार ( team – Scales & Tales ) यांनी घोरावडेश्वर गहुंजे येथील वनक्षेत्रातील जागेत वन्यजीवांची हत्या अनाधिकृत प्रकारे चाललेली बेसुमार वृक्षतोड वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच महिलेंचे छेडछाड प्रकरण बर्याचदा दिसुन येत असुन ह्या संदर्भात कही लोकांनी ह्या वनक्षेत्रातील जागेत ट्रेकिंग पिकनिक स्पाॅट तसेच जुगार दारू अड्डा बनवला असल्यामुळे आणि येथील वनक्षेत्रातील होत असलेल्या शहरीकरणाने वन्य क्षेत्रातील पक्षी वन्य प्राणी झाडे यांना मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने वनविभागाने घोरावडेश्वर गहुंजे येथील वन्यरक्षीतक्षेत्र कायमस्वरूपी लोकांसाठी बंद करण्यात आले असुन….. जर कोणी या ठिकाणी किंवा वन्यक्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे …… त्याच सोबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सदस्यांनी दिवस भरामध्ये काही सर्पांना जीवदान दिले आणि वनअधिकारी रेखा वाघमारे यांच्या देखरेखीखाली निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + 12 =

error: Content is protected !!
Exit mobile version