नवी मुंबई,दि. 29सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उलवे इथे एकाला खंडणीखोर बोगस पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. चौधरी याने पत्रकार असल्याची बतावणी करत डेअरी चालकाकडे दोन हजारांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिला म्हणून चौधरी याने बनावट पिस्तूलातून गोळीबार केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
बनावट पिस्तुलने गोळीबार करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या उलवे यु- ट्यूब चॅनलचा पत्रकार आशिष दिनकर चौधरी याला न्हावा-शेवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले मेड इन जर्मनीचे ९ एएम चे बनावट पिस्तुल जप्त केले आहे. त्याने केलेला गोळीबार सीसीटीव्हीमद्ये चित्रित झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आशिष चौधरी याच्यावर खंडणी आणि आर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली.