Home उस्मानाबाद शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार; पोलिसांकडुन शोध...

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार; पोलिसांकडुन शोध सुरु

0

उस्मानाबाद,दि.17 आॅगस्ट 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार झाला आहे. अजिंक्य टेकाळे असे या आरोपीचे नाव आहे. तो उस्मानाबादच्या जेलमधून फरार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला झाला होता.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 16 ऑक्टोबर 2019 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे हल्ला झाला होता. त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे याला अटक करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांपासून तो जेलमध्ये होता. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारगृह उभारण्यात आले आहे.त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते.

वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जेलमध्ये परतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध सुरु आहे.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं बुधवारी 16 ऑक्टोबरला ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम राजे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली.

खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 19 =

error: Content is protected !!
Exit mobile version