चिंचवड,दि.11 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासन यांच्याततील सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी दि.9आॅगस्ट ला आमदार महेश लांडगे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अक्षरशः हात जोडले. ‘मी तुमच्यात देव पाहतो. ही वेळ आपसात भांडण्याची नाही, तर कोरोनाविरोधात लढण्याची आहे, आवाहन कर्मचाऱ्यांना केले. अखेर लांडगे यांच्या मध्यस्थीला यश मिळाले आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण येऊ लागला. रुग्णांची हेळसांड होऊ नये. याकरिता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.
दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य विभागाचे डॉ. पवन साळवी यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. कर्मचारी प्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी, आमदार लांडगे यांनी रुग्णालय आवारात संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांशी संवाद साधला.
आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये गेले 3 दिवस चालू असलेले हॉस्पिटल प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टरर्स, नर्स) यांच्यामध्ये असलेले आंदोलन मागे घेऊन वैद्यकीय सेवा सुरु करण्यास सुरुवात केली.
आमदार लांडगे म्हणाले की, ‘मी तुमच्यामध्ये देव पाहतो…आताची वेळ आपापसात भांडण्याची नाही, तर कोरोनाशी लढा देण्याची आहे. कर्मचाऱ्यांनी लोकांचा आणि रुग्णांचा विचार करावा.
मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा…
आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांच्या व्यथा मला माहीत आहेत. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण, ही वेळ भांडण्याची नाही. तुम्ही शहरातील नागरिकांची सेवा करीत आहेत. अनेकांचे प्राण तुम्ही वाचवले आहेत. पण, आज कोरोनाशी लढण्याची वेळ असून आंदोलनाची नाही. कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या प्रशासनाकडे मांडून आपणास न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिले. त्याला कर्मचारी आणि प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला.
All the best Vikasji to achieve award and wish more and more progress for future endeavors.