देहुरोड,दि.10 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नांदेड जि. ता . लोहा माळेगाव यात्रा या गावातील काही खोडसळ मनुवादी वृत्तीच्या मनोरूग्न असलेल्या समाजकंठकाने विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करून विटंबना केलेच्या निषेधार्थ 8 आॅगस्ट 2020 रोजी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले गट) देहुरोड शहराच्या वतीने सुभाष चौक येथे अंदोलन करण्यात आले.
देहुरोड RPI(A) शहर अध्यक्ष सुनिल गायकवाड यांनी मनुवादी वृत्तीच्या विटंबना करणार्या अशा औलादीना कडक शासन करुन कारवाई करा अशी मागणी केली.तर जेष्ठ नेते देहुरोड RPI(A) दिलीप कडलक यांनी अशा खोडसाळ प्रकार करणार्यांना धडा शिकवला पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक एका समाजाला नाही तर सर्वच समाजाला घातक आहेत. जेष्ट नेते देहुरोड RPI(A)
सिद्धार्थ चव्हाण यांनी बोलते वेळी अशा औलादी ठेचुन काढल्या पाहिजे एक अरोपी पकडला आहे तर त्याला कडक शासन करा अन्यथा उग्र अंदोलन करु असा इशारा दिला.बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष-संजय धुतडमल,जेष्ट नेते देहुरोड RPI(A) अशोक चव्हाण, नगीना काझी-अध्यक्षा महिला आघाडी देहुरोड RPI(A),यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला,
मुख्यंमंञी उध्दव ठाकरे व गृहमंञी अनिल देशमुख तसेच देहुरोड पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार अशोक नवले यांनी निवेदन स्वीकारले यावेळी राजु शं मखरेदेहुरोड RPI(A)
संघटक,नितीन गजभीव देहुरोड RPI(A) संघटक, अमित इंगळे-देहुरोड RPI(A) ,इंद्रपालसिंग रत्तु( उपाध्यक्ष पुणे जिल्हा),जसविंदर सिंग रत्तु युवा देहुरोड RPI(A) अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते,राहुल भिमराव गायकवाड देहुरोड RPI(A) उपाध्यक्ष यांनी सुञसंलन केले.